
गोठ्यामध्ये जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी याबाबत बऱ्याच अंशी आणि अनेक ठिकाणी दुर्लक्ष जाणवते. अनेक ठिकाणी जनावरांसाठी अत्यल्प जागा असते. अधिक जनावरे असलेल्या गोठ्यात त्यांची कुचंबणा होताना दिसून येते. अनेक जनावरांच्या शिंगांची अवाजवी वाढ झाल्यामुळेही जागा अधिक लागते. आजारी जनावरे, गाभण जनावरांनाही निरोगी जनावरांसोबतच ठेवले जाते. अशावेळी किमान अंतर राखून जनावरे राहून शकतील इतकी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. जागेची आवश्यकता निरोगी जनावरांना त्यांच्या रोजच्या, नियमित व साहजिक अशा हालचाली करण्यासाठी योग्य जागा आवश्यक असते. जनावरांचे स्नायू, सांध्यांना विशिष्ट प्रमाणात व्यायाम, रक्ताभिसरण होणे आवश्यक असते. अन्यथा, त्यांचे आरोग्य नकळत खालावत जाते. त्याचा परिणाम त्यांच्या हृदयाच्या क्षमतेवर होतो. एकूणच जनावर अक्षक्त बनतात. त्याच्या सर्व शरीरक्रियांना शिथिलता येते. श्वासोच्छ्वास, पचन, मलमूत्र विसर्जन अशा क्रिया सहज करणाऱ्या किडनी, यकृतासारख्या अवयवांच्या कार्यक्षमतेवरही अनिष्ट परिणाम होतो. त्वचारोगाच्या शक्यता वाढतात. मलमूत्र विसर्जनासाठीही जागा अपुरी असल्यास त्यातून अनेक रोग दाटीवाटीने गोठ्यात राखलेल्या जनावरांना होवू शकतात. अर्थातच, या सर्वांचा परिणाम त्यांच्या प्रजोत्पादन आणि उत्पादन करणाऱ्या शरीरक्रियांना होतो. दुभत्या जनावरांच्या बाबतीत तो उत्पादनावर गुणात्मकही परिणाम करू शकतो. एकूण उत्पादनासोबत दुधाच्या घटकांवरही त्याचा परिणाम होवू शकतो. गाईसाठी लागणारी जागा
- डॉ. संतोष कुलकर्णी, ८३२९०३२१६४ (स्वेच्छानिवृत्त प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.