लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहा

पावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा आजार सर्व पाळीव प्राणी तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होतो. यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.
Keep animals shed clean for keeping animals in good health.
Keep animals shed clean for keeping animals in good health.

पावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा आजार सर्व पाळीव प्राणी तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होतो. यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी. जनावरांची जंतुयुक्त लघवी, गर्भाशयातील स्त्राव हे गटारातील पाणी, सांडपाणी, पुराचे रस्त्या साठलेल्या पाण्यात मिसळतात, यातून लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रसार होतो. गोठ्यात अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी, चारा, खाद्यपदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्क आल्यामुळे ते दूषित होतात. पावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा आजार सर्व पाळीव प्राणी, तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होतो. म्हणून या आजारास प्राणी संक्रमक आधार म्हणतात. खूप पाऊस पडणाऱ्या, पाणथळ, सखल भागात जेथे पाणी साठून राहते तसेच अल्कलीयुक्त क्षारयुक्त जमिनीच्या प्रदेशात, ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रसार

 • जनावरांची लघवी, गर्भाशयातील स्त्राव हे गटारातील पाणी, सांडपाणी, पुराचे रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळतात, यातून याचा प्रसार होतो.
 • जिवाणू उंदराच्या शरीरात सुप्तावस्थेत असतात. त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने प्रसार होतो. हे जिवाणू डोळे, नाकातोंडातून तसेच माणसाच्या त्वचेवरील लहान जखमेतून शरीरात प्रवेश करतात.
 • भात शेती, ऊस मळ्यात काम करणारे शेतकरी, साचलेल्या पाण्यात/खाण  कामगार, जलवाहिन्या, गटारे, स्वच्छतागृहे यामध्ये काम करणारे मजूर, जनावरांच्या संपर्क येणारे शेतकरी, रोगाने बाधित जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक आणि कत्तलखान्यातील खाटीक यांना या आजाराचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 
 • पोहण्याच्या तलावातील पाण्यातून संसर्ग देखील होऊ शकतो. 
 • गोठ्यातील अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी, चारा, खाद्य पदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्कात आल्यामुळे दूषितीकरण होते.
 • निदान 

 • रक्तातील बिलीरुबिन, ट्रान्सअमायलेज, एसजीओटी, एसजीपिटी या घटकांची मोजणी करून निदान करता येते.
 • लक्षणे, आजाराचा इतिहास रक्त लघवीमध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव तपासावा.रक्तजल चाचणी, एलायझा या पद्धतीने खात्रीशीर निदान होते.
 • औषधोपचार  लक्षणानुसार प्रभावी प्रतिजैविके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत. प्रतिबंधक उपाय 

 • उंदीर, घुशी यांची संख्या कमी होण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी, गोठा तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवावी.
 • शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत.
 • पुराच्या ठिकाणी तुंबलेल्या साठलेल्या पाण्यात, पोहण्याच्या तलावातील पाणी जंतुविरहित असल्याची खात्री करूनच प्रवेश करावा.
 •  पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक साथीचे आजार पसरतात. पाणी उकळून गाळून प्यावे.
 • कुत्र्यांसाठी सेव्हन इन वन ही लस उपलब्ध असून ती दरवर्षी टोचून घ्यावी.
 • आजाराची लक्षणे  गाय,म्हैस 

 •  शरीरात जिवाणूंचा प्रवेश झाल्यानंतर ते रक्तात मिसळतात, वाढतात व सेफ्टीसेमिया होतो.
 • गाई, म्हशींमध्ये गर्भपात आणि दुधात रक्त आढळून येते.
 • वासरांमध्ये आजाराचे प्रमाण ७० टक्के असते. गाई-म्हशींमध्ये मृत्यूचे प्रमाण ५ टक्के इतके असते. 
 • शेळी-मेंढी

 •  करडे, कोकरांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त आढळते. मृत्यूचे प्रमाण देखील १५  ते २० टक्के इतके असते. 
 •  शेळ्या, मेंढ्यांमध्ये शारीरिक झीज आणि अशक्तपणा यामुळे मटणाला बाजारात कमी किंमत मिळते.
 • मूत्रपिंडावर पांढऱ्या रंगाचे ठिपके हे प्रमुख लक्षण कत्तलखान्यातील कापलेल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळून येते.
 • कुत्रा मूत्रपिंड व मूत्राशयाचा दाह, कावीळ होते, रक्त, लघवीतील घटकांचे प्रमाण वाढते आणि युरेमिया होतो. मनुष्य 

 • १०४ ते १०५ अंश फॅरानाइट ताप येतो.
 •  डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या होतात, डोळे लाल होतात. अंगावर पुरळ दिसते.
 •  लसिकाग्रंथी, टॉन्सिल, प्लिहा, यकृत यांना सूज येते, आकार मोठा होतो.
 •  कावीळ दिसू लागते, रुग्णाला खोकला येतो. धाप लागते, थुंकीतून रक्त पडते.
 •  दातखीळ बसते, रुग्ण बेशुद्ध होतो. 
 •  यकृत व मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. 
 • - डॉ. गुणाजी यादव,  ९६५७११०३८१ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com