योग्य पशुधनाची निवड महत्त्वाची

दुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी कृषिपूरक व्यवसाय फायदेशीर ठरतो. यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जातींच्या पशुधनाची निवड महत्त्वाची ठरते.
Konkankanyal goat and Madgyal sheep
Konkankanyal goat and Madgyal sheep

दुग्ध व्यवसायासोबत मांस, लोकर आदी उत्पादनांसाठी कृषिपूरक व्यवसाय फायदेशीर ठरतो. यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य जातींच्या पशुधनाची निवड महत्त्वाची ठरते. म्हैस, शेळी आणि मेंढीपालन करताना त्यांची शारीरिक स्थिती, दूग्ध उत्पादन क्षमता, वय, वेत, वंशावळ आणि आरोग्य या बाबी महत्त्वाच्या ठरतात. शेळ्यांच्या जाती  उस्मानाबादी 

  • ही जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखली जाते.
  • उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नगर, सोलापूर तसेच विदर्भात सर्वदूर या शेळ्या दिसून येतात.
  • उत्पादनाला किफायतशीर, या शेळ्यांची वाढ अतिशय जलद होऊन वर्षभरामध्ये ४० ते ५० किलोच्या होतात.
  • उंच असतात. नराचे वजन सरासरी ३३.५ किलो, मादीचे वजन ३१.५ किलो.
  • साधारणतः ७५ टक्के शेळ्या रंगाने काळ्या असतात. करड्या, पांढऱ्या, ठिपकेदार सुद्धा काही शेळ्या दिसून येतात.
  • जुळ्या करडांसाठी प्रसिद्ध जात. उत्तम व्यवस्थापनातील शेळ्या ३,४ आणि ५ पर्यंत पिल्ले एकाच वेतामध्येच दिल्याचे आढळले आहे.
  • शारीरिक गुणधर्म 

  • रंग - काळा
  • कान - लोंबकळणारे.
  • शिंगे - मागे वळलेली
  • उंची - ६५ ते ७० सेंमी
  • लांबी - ६० ते ६५ सेंमी
  • छाती - ६५ ते ७० सेंमी
  • शारीरिक वजन 

  • जन्मतःच करडाचे वजन सरासरी अडीच किलो.
  • पूर्ण वाढ झालेली शेळी ः ३०-३५ किलो.
  • पूर्ण वाढ झालेला नर ः  ४५-५० किलो.
  • पैदाशीचे गुण वैशिष्टे 

  • वयात येण्याचे वय ः ७ ते ९ महिने
  • प्रथम गाभण राहण्याचे वय ः ९ ते १० महिने 
  • पहिल्यांदा विण्याचे वय ः १३ ते १५ महिने 
  • दोन वेतातील अंतर ः ८-९ महिने 
  • नर, मादी करडे जन्म प्रमाण १:१ 
  • पुन्हा माजावर येण्याचा काळ ः २० ते २१ दिवस
  • कोकण‬ कन्याळ 

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
  • मांस उत्पादनासाठी उत्तम, कोकणातील वातावरणामध्ये तग धरण्यासाठी क्षमता.
  • वरच्या जबड्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे,पाय काळ्या पांढऱ्या रंगाचे असतात.
  • पाय लांब आणि मजबूत, त्यामुळे चारा खाण्यासाठी टेकड्यांवर आरामात चढू शकतात.
  • कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणारे पावसाचे पाणी चटकन खाली पडते.शरीरावर छोटे केस आढळतात.
  • डोक्यावर नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे.
  • कपाळ काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद.
  • कान रंगाला काळे, पांढऱ्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे.
  • शिंगे टोकदार, सरळ आणि मागे वळलेली.
  • नाक रूंद आणि स्वच्छ असते.
  • जन्मतः वजन १.७६ ते २.१९ किलो (सरासरी १.१९ किलो)  
  • वैशिष्ट्ये बोकड शेळी
    वजन ५२.५७ किलो ३२.८३ किलो  
    उंची  ८३ सेंमी ६८.६ सेंमी
    छातीचा घेर ९० सेंमी ७४ सेंमी
    लांबी  ७१ सेंमी ७१ सेंमी

    पैदाशीचे गुण वैशिष्ट्ये 

  • नियमित आणि वर्षभर माजावर येतात.
  • जुळ्यांचे प्रमाण ६६ टक्के .
  • उन्हाळ्यामध्ये विणाऱ्या शेळ्यांमध्ये जुळ्यांचे प्रमाण जास्त.
  • संगमनेरी‬  आढळ :  नाशिक, नगर, पुणे. शारीरिक गुणधर्म  

  • रंग - पांढरा (६६%), पांढरट तांबडा आणि तांबडा (१६%) रंग.
  • नाक - तांबडे, काळे.
  • पाय - काळे, तांबड्या रंगाचे.
  • शिंगे - अंदाजे ८ ते १२ टक्के शेळ्या या बिनशिंगी (भुंड्या) आढळतात. काही शेळ्यांमध्ये शिंगे आढळतात.
  • - शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली
  • कान- प्रामुख्याने लोंबकळणारे, परंतु काही शेळ्यांमध्ये उभे किंवा समांतर.
  • कपाळ - बर्हिवक्र आणि सपाट.
  • दाढी- अगदी तुरळक प्रमाणात.
  • शेपटी - बाकदार आणि सरासरी लांबी १८.४६ +०.२५ सेंमी.
  • कास- गोलाकार (४२%), वाडग्यासारखे (२५%), लोंबकळणारे (२२%).
  • सड - गोलाकार आणि टोकदार.
  • सुरती (खानदेशी/ निवानी)  आढळ :  धुळे, जळगांव, गुजरात राज्य. शारीरिक गुणधर्म 

  • रंग ः पांढरा.
  • कान ः लांबट आणि रुंद.
  • कास ः मोठी.
  • दूध उत्पादन ः दररोज एक ते दीड लिटर. एका विताच्या हंगामात सरासरी १२० ते १५० लिटर.
  • वजन ः जन्मतः २.५ किलो.
  • पूर्ण वाढ झालेली शेळी २५ ते ३०किलो.
  • मेंढीच्या जाती  डेक्कनी मेंढी  आढळ 

  • महाराष्ट्राचा दक्षिण-पूर्व भाग आणि आंध्र प्रदेशचा काही भाग.
  • महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, आणि औरंगाबाद.
  • रंग ः काळा (५७%), पांढरा (२८%) आणि काळा पांढरा, मिश्र रंग (१५%).
  • आकाराने लहान आणि छोटी शेपटी.
  • उत्पादन 

  • लोकरः जाडी भरडी आणि सरासरी वार्षिक उत्पादन ७०० ग्रॅम.
  • मांस उत्पादन ः कत्तलीचे वय सहा महिने आणि मांसाचा उतारा ४९.६+१८%
  • माडग्याळ मेंढी  सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, रांजणी, माडग्याळ, सिद्धनाथ. शारीरिक गुण वैशिष्ट्ये 

  • रंग - पांढरा आणि त्यावर तपकिरी मोठे ठिपके .
  • नाक- पोपटासारखे बर्हिवक्र नाक .
  • शिंगे - नर आणि मादी दोघांमध्येही शिंगे आढळत नाहीत.
  • उंची - प्रौढ मेंढा नर ः सरासरी उंची खांद्यापर्यंत ८० सेंमी (३२ इंच) ते ८८ सेंमी (३५ इंच).
  • प्रौढ मेंढ्या ः ६३ सेंमी (२५ इंच) ते ७५ सेंमी (३० इंच).
  • जुळ्यांचे प्रमाणः अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी
  • सरासरी वजन वाढीचा वेग २२५ ग्रॅम प्रतिदिन.
  • प्रजनन क्षमता कालावधी ९ ते १२ महिने
  • एकूण पैदाशीचा कालावधी - ७ ते ८ वर्षे
  • सर्वसाधारण आयुष्यमान- १४ ते १५ वर्षे.
  • लोकर :  जाडी भरडी आणि सरासरी वार्षिक उत्पादन २५० ते २६० ग्रॅम.
  • दूध :  कोकरापुरते दूध उपलब्ध.
  • - डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ (पशूपोषण शास्त्र विभाग, बारामती ॲग्रो लिमिटेड,बारामती,जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com