कालवडीतील प्रजनन संस्थेचे महत्त्व..

अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः कालवडीतील प्रजनन नियमित असणे गरजेचे असते. वर्षाला वासरू या तत्त्वावर दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याकरिता वेळोवेळी पशुवैद्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
Breeding management of calves
Breeding management of calves

अधिक दुग्धोत्पादनाकरिता दुधाळ जनावरांतील विशेषतः कालवडीतील प्रजनन नियमित असणे गरजेचे असते. वर्षाला वासरू या तत्त्वावर दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याकरिता वेळोवेळी पशुवैद्यक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कालवडीचे प्रजनन व्यवस्थापन 

  • स्वतःच्या गोठ्यामध्येच जन्मलेली कालवड पुढील यशस्वी व्यवसायाकरिता लाभदायक असते.
  • कालवड जन्मल्यापासून वाढत्या वयानुसार योग्य व्यवस्थापन करावे.
  • तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियमित जंतुनाशक द्यावे. कालवडीच्या वयानुसार जंतनाशकची योग्य मात्रा देणे आवश्‍यक आहे.
  • वार्षिक लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे करावे.
  • संतुलित आहाराचा पुरवठा करावा. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, विविध जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ व इतर घटकांची मात्रा योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
  • कालवडीच्या वयानुसार गर्भाशयाची वाढ होणे अपेक्षित असते.
  • तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने वेळोवेळी गर्भाशय हाताळणी किंवा सखोल तपासणी करावी. यामध्ये गर्भाशयाची योग्य वाढ, बीजांड निर्मिती व वाढ, स्त्रीबीज निर्मिती व इतर संलग्न बाबींच्या तपासणीसोबत योग्य निदान करणे गरजेचे आहे. यानुसार गर्भाशय वाढीकरिता उपचार निश्‍चित करता येते.
  • कालवडीचा पहिला माज किंवा माजावर येण्याच्या चक्राची सुरुवात ही वयापेक्षा जनावराच्या वजनावर अवलंबून असते. किमान २५० किलो वजन असेल तरच कालवड माज दाखवणे अपेक्षित असते.
  • दर २१ दिवसांनी माजाचे चक्र सुरू असते. कालवडीचा माजाचा कालावधी कमी असतो. सर्वसाधारणपणे १२ ते १८ तास माजाचा कालावधी असतो. याकरिता रेतनाची वेळ निश्‍चित करावी.
  • माजाची योग्य लक्षणे ओळखावीत. याकरिता बाजारामध्ये काही तांत्रिक उपकरणे आलेली आहेत. या उपकरणांच्या मदतीने रेतनाची वेळ निश्‍चित करण्यास मदत होते.
  • ढोबळमानाने कालवडीतील माजाची लक्षणे सकाळी दिसून आल्यास, संध्याकाळी रेतन करावे. आणि संध्याकाळी माजावर आल्यास, दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे.
  • संकरित कालवडींचा माजाचा कालावधी थोडासा जास्त असतो. साधारणपणे १२ ते २४ तास माज असतो. त्यामुळे दोन किंवा तीन वेळेस रेतन करणे गरजेचे आहे.
  • सुरुवातीचे १ किंवा २ माज सोडून नंतरच्या माजास आवश्यक रेतन करावे.
  • गाभण काळात शक्यतो कालवड माज दाखवत नाही. या काळात माजाचे चक्र बंद असते. अति दुर्मीळ कालवडीत गाभण काळात माजाची क्षीण लक्षणे दिसण्याची शक्यता असते. अशावेळी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी करून गर्भाची खात्री करावी.
  • गाभण काळातील गर्भवती कालवडीचे योग्य संगोपन करावे. अधिक दुग्ध उत्पादन व सुदृढ वासराच्या निर्मितीकरिता कालवडीचे गाभण काळातील व्यवस्थापन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे असते.
  • प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर कालवडीची योग्य निगा राखणे आवश्‍यक आहे.
  • - डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (पशु प्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, माफसू, उदगीर जि.लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com