
गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. एकाच वर्गातील गोचीडनाशके सतत वापरू नयेत. तीव्रता कमी-जास्त होताना आलटून-पालटून वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचिडनाशकांचा वापर करावा. जनावरांमध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव होत असतो. साधारणपणे ज्या गायीच्या शरीरावर १०० पेक्षा जास्त गोचिडे आहेत, तिच्यापासून २३ टक्के दुग्धोत्पादनामध्ये घट होते. म्हणजेच दहा लिटर दूध देणारी गाय ८ लिटर दूध देते. गोचिड नियंत्रणासाठी पशुपालक सातत्याने गोचीडनाशके जनावरांच्या शरीरावर फवारतात; परंतु त्यांचा जेव्हा अतिरेक होतो, एकच एक गोचीडनाशक सतत वापरले जाते, मात्रा कमी-जास्त प्रमाणापेक्षा वापरली जाते, गरज नसताना फवारणी केली जाते अशा वेळेस ठरलेल्या गोचीडनाशकाच्या मात्रेस ५० टक्क्यांपेक्षा जास्त गोचिडे दाद देत नाहीत, प्रतिकार करतात. हीच प्रतिकारशक्ती पुढील पिढ्यांमध्येदेखील प्रसारित केली जाते. यास गोचीडनाशकांना प्रतिकारक्षमता असे म्हणतात. यामुळे विनाकारण गोचिनाशकांसाठी केलेला खर्च वाया जातो आणि गोचिडांचा प्रादुर्भाव तसाच राहतो. ऑरगॅनोक्लोरीन व ऑरगॅनोफॉस्फेट दोन गटांतील रासायनिक गोचीडनाशकांप्रती प्रतिकारक्षमता वाढली आहे. म्हणून पायरेथ्रॉइड या गटातील गोचीडनाशकाचा वापर आज प्रभावीपणे होत आहे. तसेच इतरही गटातील गोचीडनाशके बाजारात आहेत; परंतु पुढील पिढीपर्यंत त्यांच्याबाबतही प्रतिकारक्षमता वाढू नये म्हणूनच आज काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिकार वाढण्याची कारणे
उपाययोजना
संपर्क : डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ डॉ. जगदीश गुडेवार, ९७३००६६८४७ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.