जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजना

संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याचे दिसून येते. या विषबाधेची लक्षणे तपासून उपाययोजना करावी.
संकरित गाईंची योग्य काळजी घ्यावी
संकरित गाईंची योग्य काळजी घ्यावी

संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते. सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याचे दिसून येते. या विषबाधेची लक्षणे तपासून उपाययोजना करावी. उत्तम दुग्धोत्पादनासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस या मुख्य क्षारांची जास्त प्रमाणात गरज असते. तसेच काही सूक्ष्मक्षारांचीही गरज असते. परंतु उपलब्ध चाऱ्यामधून या क्षारांची गरज पूर्ण होत नाही. या क्षारांची गरज क्षार मिश्रण, क्षारयुक्त द्रावण, कॅल्शिअम, फॉस्फरस- मॅग्नेशिअमयुक्त सलाइनद्वारे भागवली जाते. परंतु बऱ्याच वेळा पशुपालक जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता होऊ नये म्हणून कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेतून सतत देतात. विशेषत: संकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले जाते.  सतत व जास्त प्रमाणात कॅल्शिअमयुक्त सलाइन जनावरांना शिरेवाटे दिल्यास कॅल्शिअमची विषबाधा झाल्याची दिसून येते. याची कारणे तपासून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. विषबाधेची मुख्य कारणे 

  • कॅल्शिअम शिरेवाटे जास्त प्रमाणात  दिल्याने विषबाधा होते.
  • कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेवाटे जलद गतीने देणे.
  • गरज नसताना जास्त काळ आणि वारंवार कॅल्शिअम देणे.
  • रक्तात विषारी पदार्थ असताना कॅल्शिअम देणे.
  • शिरेवाटे कॅल्शिअमयुक्त सलाइन देताना जनावरांनी जास्त उड्या मारणे किंवा उत्तेजित होणे.
  • जनावरांना तोंडावाटे कॅल्शिअम घटक जास्त प्रमाणात, अनियमित वेळा देणे.
  • जनावरांना जास्त प्रमाणात द्विदल चारा देणे किंवा जनावराच्या आहारातील जास्त फॉस्फरसचे प्रमाण (धान्याचा जास्त प्रमाणात वापर.)
  • विषबाधेची लक्षणे 

  • रक्तामध्ये विषारी घटक असणाऱ्या जनावरांमध्ये नाडीच्या ठोक्यांचा दर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येतो, श्‍वसनाचा त्रास होणे, अडखळत चालणे, पडणे. काही मिनिटांमध्ये अशी जनावरे मृत्युमुखी पडतात.
  •  काही तंदुरुस्त जनावरांमध्ये हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो.
  •  घाबरलेल्या किंवा अति उत्तेजित जनावरांमध्ये कॅल्शिअम शिरेवाटे दिल्यास जनावर काहीही लक्षणे न दाखवता तत्काळ मृत्युमुखी पडते.
  •  शरीर तापमानात घट होणे, केस उभे राहतात, अशक्तपणा, मूतखडा, हाड व मांसपेशीमध्ये अशक्तपणा.
  •  पोट गच्च होणे.
  •  इतर क्षारांचे शोषण कमी होणे.
  • लक्षणे तपासून उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
  • विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना 

  • कॅल्शिअमयुक्त सलाइनच्या बॉटलमध्ये कचरा, बुरशी आहे का ते पाहावे. जर कॅल्शिअमयुक्त सलाइन स्वच्छ असेल तरच ते जनावरांना द्यावे.
  •  जनावरांना शिरेवाटे कॅल्शिअम सलाइन देण्याआधी जनावरांच्या शरीर तापमानाबरोबर कॅल्शिअमयुक्त द्रावणाचे तापमान आणावे. त्यानंतरच कॅल्शिअम सलाइन द्यावे.
  • जनावरांमध्ये कॅल्शिअमयुक्त सलाइन शिरेवाटे हळूहळू मंदगतीने द्यावे.
  • कॅल्शिअमची अति मात्रा देऊ नये.
  • कॅल्शिअमयुक्त सलाइन देतेवेळी स्टेथॉस्कोपच्या साह्याने हृदयक्रियेची तपासणी करावी.
  • ज्या जनावरांना टॉक्सेमिया आहे, अशा जनावरांत कॅल्शिअम शिरेवाटे न देता त्वचेखाली द्यावे. कॅल्शिअमची मात्रा २५० मिलिपेक्षा वाढवू नये.
  • ज्या वेळी कॅल्शिअमचे सलाइन जनावरांना देणे सुरू आहे, त्या वेळी जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.
  • विनाकारण वांरवार कॅल्शिअमचा अतिवापर टाळावा.
  •   कॅल्शिअम द्रावणात/ सलाइनमध्ये इतर औषधे मिसळू नये.
  • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.
  • - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ८३२९७३५३१४,  (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com