शेतकरी नियोजन : कुक्कुटपालन

मी मागील १० वर्षांपासून करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार कंपनीकडून पोल्ट्री उत्पादकाला साधारण एक दिवसाचे पिल्लू दिले जाते. ही पिल्ले साधारण ३२ ते ४२ दिवस शास्त्रीयदृष्ट्या वाढवून कंपनीला दिली जातात. असे व्यवसायाचे स्वरूप आहे.
Special emphasis on food management helps the birds to achieve the expected weight.
Special emphasis on food management helps the birds to achieve the expected weight.

     शेतकरी- वैभव अशोक बर्गे      गाव - चिंचनेर वंदन, जि.सातारा      ब्रॉयलर कोंबड्या - प्रति बॅच ६ हजार कोंबड्या      शेड - ७ हजार चौ.फूट  सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाबरोबरच सैनिकी परंपरा असलेले गाव म्हणून आमचे चिंचनेर वंदन हे गाव ओळखले जाते. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर मी चार वर्षे नोकरी केली. फिरतीचे काम असल्याने अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटी देण्याचा योग आला. आपणही शेतीमध्येच काहीतरी भरीव काम करावे असे सातत्याने मनात येई. वडील आणि लहान भाऊ विनोद यांच्यासोबत चर्चा करून नोकरी सोडून पूर्णवेळ पोल्ट्री व्यवसाय करण्याचा निर्णय सांगितला. कुटुंबातील सदस्यांनी होकार दिल्यानंतर सन २०१० मध्ये बॅंकेकडून कर्ज घेऊन व्यवसायास सुरुवात केली. व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी यशस्वी पोल्ट्री उत्पादकांना भेटी दिल्या. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजावून घेतले. कुक्कुटपालन व्यवसायातील सर्व कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांची मोलाची मदत होते.  व्यवस्थापनातील बाबी 

 • मी मागील १० वर्षांपासून करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार कंपनीकडून पोल्ट्री उत्पादकाला साधारण एक दिवसाचे पिल्लू दिले जाते. ही पिल्ले साधारण ३२ ते ४२ दिवस शास्त्रीयदृष्ट्या वाढवून कंपनीला दिली जातात. असे व्यवसायाचे स्वरूप आहे.
 • ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी सुमारे ७ हजार चौ.फूट क्षेत्रफळांचे शेड उभारले. सुरुवातीला शेडमध्ये ७ हजार कोंबड्या होत्या. मात्र, शेडमध्ये हवा खेळती राहावी आणि प्रति कोंबडी पुरेशी जागा मिळून त्यांची मरतूक कमी होण्यासाठी शेडचा विस्तार केला. त्याचबरोबर कोंबड्यांची संख्या कमी करून सहा हजारांवर आणली आहे. 
 • आम्ही वार्षिक सरासरी पाच बॅच घेतो. एका बॅचमध्ये सुमारे सहा हजार कोंबड्या असतात. 
 • कंपनीकडून पिल्ले मिळाल्यानंतर सुरुवातीचे ७ दिवस विशेष काळजी घेतली जाते. कंपनीने दिलेले खाद्य व स्वच्छ पाणी वेळच्यावेळी दिले जाते.योग्य व्यवस्थापनामुळे पिल्लांचे वजन चांगले भरण्यास मदत होते. कोंबडी साधारण ४२ दिवसांची झाल्यानंतर कंपनीस दिली जाते.   
 • रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच लसीकरण केले जाते. प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेड स्वच्छ व निर्जंतुक केले जाते. 
 • बॅच गेल्यानंतर उपलब्ध कोंबडी खताच्या विक्रीतून वीजबिल आणि अन्य खर्च भागविला जातो. 
 •  कंपनीच्या गाड्या शेडवर येऊन कोंबड्या घेऊन जातात. या गाड्या शेडवर आणण्यापूर्वी स्वच्छ धुवून निर्जंतुक केल्या जातात. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका कमी होतो. 
 • उन्हाळ्यात फॅन, कुलर, स्प्रिंकलर, फॉगर लावून शेडमधील उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कोंबड्यांना थंड पाणी उपलब्ध केले जाते. शेडभोवती झाडे लावली आहेत. 
 • पावसाळ्यात ओलावा होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. हिवाळ्यात हिटरच्या साह्याने शेडमधील उष्णता योग्य राखली जाते. वातावरण बदलानुसार योग्य व्यवस्थापन केल्यामुळे कोंबड्यांची मरतूक कमी होते. 
 • - वैभव बर्गे,  ९८५०७३७५७१ 

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com