शेतकरी नियोजन : मेंढीपालन

आम्ही तीन पिढ्यांपासून माडग्याळी मेंढीपालन करत आहोत. सुरुवातीला १५ मेंढ्यांच्या संगोपनापासून सुरु केलेला व्यवसाय आज १०० मेंढ्यापर्यंत पोचला आहे. या व्यवसायाच्या जोरावर जिरायती शेती बागायती केली. बाजारात मागणीप्रमाणे मेंढ्यांची विक्री करून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
The sheep are released to graze in the orchard by free movement.
The sheep are released to graze in the orchard by free movement.

शेतकरी - शरद रावसाहेब पवार गाव - येळवी, ता. जत, जि. सांगली. माडग्याळी मेंढ्या - १०० आम्ही तीन पिढ्यांपासून माडग्याळी मेंढीपालन करत आहोत. सुरुवातीला १५ मेंढ्यांच्या संगोपनापासून सुरु केलेला व्यवसाय आज १०० मेंढ्यापर्यंत पोचला आहे. या व्यवसायाच्या जोरावर जिरायती शेती बागायती केली. बाजारात मागणीप्रमाणे मेंढ्यांची विक्री करून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मेंढीपालनात योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला जातो. माडग्याळी मेंढ्या काटक आणि वजनाला चांगल्या असल्याने बाजारात चांगला दर मिळतो. प्रतिकूल वातावरणात तग धरणारी अशी माडग्याळी मेंढीची ओळख आहे. व्यवस्थापनातील बाबी 

  •  प्रत्येक ऋतूच्या अगोदर सर्व शेळ्यांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण केले जाते.
  •  गाभण मेंढीला कोणत्याही प्रकारचे लसीकरण करत नाही.
  •  मेंढ्यांसाठी विशेष असा गोठा बांधलेला नाही. त्यांचा मुक्त पद्धतीने घराच्या आजूबाजूला वावर असतो.
  •  मेंढ्या दिवसभर चरण्यासाठी माळरानात सोडल्या जातात.
  •  मेंढ्यांना पोटभर चारा देण्यावर विशेष भर दिला जातो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा, तूर, हरभऱ्यांचा भुसा दिला जातो.
  •  मेंढ्यांचे निरिक्षण करून आजारी मेंढ्या वेगळ्या ठेवल्या जातात. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार केले जातात.
  •  चौथ्या ते पाचव्या महिन्यापासून कोकराची विक्री सुरु होते. त्यावेळी साधारण १५ किलोपासून ते ५० किलोपर्यंत वजन मिळते.
  •  आठवड्याला साधारण १० ते १५ मेंढ्याची विक्री होते. विक्रीवेळी साधारण साडेआठ ते ६० हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.
  •  मिरज, सांगली, विजापूर येथील व्यापाऱ्यांकडून मेंढ्यांची खरेदी केली जाते.
  • माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये 

  •  काटक, प्रतिकूल परिस्थितीत टिकण्याची क्षमता.
  •  जुळ्या कोकरांना जन्म देण्याची क्षमता.
  •  वर्षातून एकदा प्रजोत्पादन.
  • लांब पाय, निमुळती व लांब मान.
  • माडग्याळी मेंढीची प्रामुख्याने मांसासाठी विक्री.
  • - शरद रावसाहेब पवार, ९७६६३५३२४७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com