जनावरांतील दातांचे आजार अन् उपचार

जनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या आहाराच्या अनुरूप बदलते. जी जनावरे रवंथ करतात, जसे की, गाय- म्हैस, शेळी, मेंढीमध्ये सुळे दात नसतात.
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचार
The animals should be given proper quality fodder in the feed.

जनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या आहाराच्या अनुरूप बदलते. जी जनावरे रवंथ करतात, जसे की, गाय- म्हैस, शेळी, मेंढीमध्ये सुळे दात नसतात. सर्वसाधारणपणे माणसांप्रमाणेच गाई- म्हशीमध्ये प्रामुख्याने पटाशीचे दात, उपदाढा आणि दाढा असे प्रकार आहेत. जनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या आहाराच्या अनुरूप बदलते. जी जनावरे रवंथ करतात, जसे की, गाय- म्हैस, शेळी, मेंढीमध्ये सुळे दात नसतात. जनावराची निवड करताना कास, एकूण शरीरयष्टी, जनावरांचा बांधा, दुधाच्या रक्तवाहिन्यांची उभारी, इत्यादी गोष्टींचे निरीक्षण करून योग्य जनावर निवडले जाते. जनावरांच्या निवडीमध्ये दातांची रचना, त्यांची कार्यक्षमता महत्त्वाची आहे. पशुपालक दातांची पाहणी फक्त वयोमान ठरविण्यासाठीच करतात. दातांचे आजार  दातांमधील संसर्ग

 • दात आणि त्यांच्या सभोवतालच्या जबडयांच्या ऊतींना विविध जिवाणूंपासून संसर्ग होऊन, बऱ्याचदा दात हलू लागतात किंवा पडतात. संसर्गामुळे दातांची पकड ढिली पडते आणि दात हलू लागतात.
 • दातांच्या मुळांच्या जागेवर सूज येऊन, मुळांचा आकार मोठा दिसू लागतो. जनावरास वेदना होऊन त्यांना रवंथ करण्यात अडचणी येतात. यामुळे आहार घटून उत्पादनावर परिणाम होतो. अशा वेळेस जनावरास मऊ लुसलुशीत मुरघास किंवा गवत इत्यादी खाण्यास द्यावे.
 • त्रासदायक ठरणारे दात, पशुवैद्यकाच्या योग्य सल्ल्याने काढून घ्यावे. औषधोपचार करावेत.
 • पटाशीच्या दातांची अतिरिक्त झीज 

 • बऱ्याचदा जनावरे माळरानावरील खुरट्या गवतावर चरतात, अशावेळी पटाशीच्या दातांची झीज होण्याची शक्यता असते.
 • वयोमानाप्रमाणे दात झीजण्याची प्रक्रिया होते. अशा जनावरांना मोकळ्या माळरानावर चरताना खुरटे गवत, इत्यादी खाताना त्रास होतो. त्यामुळे उत्पादनक्षमता कमी होते.
 • झीज झालेले दात असणारी जनावरे गवत, कडबा, मुरघास इत्यादी आहार चांगल्याप्रकारे खातात. त्यामुळे अशा जनावरांना मोकळ्या माळरानावर चरावयास सोडू नये. शक्य असेल तेवढे हिरवे गवत, कडबा द्यावा. जेणेकरून त्यांची उत्पादन क्षमता टिकून राहील.
 • हाडांची झीज 

 • गायवर्गीय जनावरांमध्ये खालच्या आणि वरच्या जबड्यात प्रत्येकी तीन, अशा सहा जोड्या असतात. अशा एकूण बारा जोड्या असतात. तेवढ्याच उपदाढा देखील असतात.
 • चारा चावण्याचे काम उपदाढा आणि दाढा करतात. चारा गिळण्यापूर्वी ते व्यवस्थित चावून मऊसर गोळा तयार करण्यात या दाढा मदत करतात.
 • वयोमानपरत्वे झीज होत गेल्यास, जनावरांना चारा चावताना त्रास होतो. याचबरोबर सभोवतालच्या भागास चाऱ्याच्या टोकदार भागामुळे जखमा होतात. असे झाल्यास जनावरांच्या तोंडातून लाळ सतत स्रवते, चारा चावताना तोंडातून खाली पडतो. जनावराच्या जबड्याला सूज येऊन गाल फुगलेला दिसतो. असे होण्याचे कारण म्हणजे झिजलेल्या दाढेमध्ये आणि गालाच्या आतील भागात चारा चावताना/ रवंथ करताना अडकतो. त्यामुळे जर हा चारा काढला तर परत तो वेळेपरत्वे जमा होत राहतो. गाल सुजलेला दिसतो.
 • पशुवैद्यकाकडून योग्य उपचार करावेत. वाढलेल्या दातांच्या कडा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घासाव्यात.
 • वयस्क जनावरांची तपासणी करावी.
 • जनावरांच्या जबड्यातील जन्मजात दोष 

 • बऱ्याच वेळेस जनावरांमध्ये जन्मतः काही भागांची वाढ न झाल्यामुळे दोष उत्पन्न होतात. गुणसूत्रांमधील दोषामुळे हे होऊ शकतो. अशा वेळी वेडीवाकडी जबड्याची ठेवण झाल्याचे दिसून येते.
 • अशा दोषांमध्ये जनावराचा वरचा जबडा हा खालच्या जबड्यापेक्षा लांब असतो.
 • जबडा किंवा दातांचा भंग 

 • एखाद्या अपघाताने अथवा जोराचा मार लागल्याने, आघात झालेला असल्यास, दात तुटणे/ भंगणे किंवा जबड्याचे फ्रॅक्चर (अस्थिभंग) झाल्याचे आढळते.
 • अशावेळी रक्तस्राव रोखण्याकरिता बर्फाने शेकावे. त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.
 • जबड्यास भंग झालेला असल्यास योग्य शस्त्रक्रिया करावी. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही मऊ चारा खाण्यास द्यावा, आहाराबाबत काळजी घ्यावी.
 • अॅक्टीनोमायकॉसिस

 • हा जिवाणू संसर्ग आजार होतो. वय वाढत असताना, पक्क्या दातांची पडझड झाल्यानंतर किंवा तोंडाच्या आतमध्ये विविध कारणांनी झालेल्या जखमांमधून जिवाणू प्रवेश करतात.
 • संसर्गानंतर जबड्यास सूज येते. जखमांमध्ये पू भरतो. यामुळे रवंथ करताना, चारा चावताना जनावरास वेदना होतात.
 • तातडीने औषधोपचार करावेत.
 • दातांची रचना 

 • गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांच्यामध्ये सुळे दात नसतात.तसेच वरच्या जबड्यामध्ये पटाशीचे दात नसतात. परंतु दाढा आणि उपदाढा या दोन्ही जबड्यांमध्ये असतात. वरच्या जबड्यामध्ये पटाशीच्या दाताऐवजी कडक भाग असतो, त्याला ‘डेंटल पॅड’ म्हणतात.
 • त्यांच्यातील दुधाचे दात त्यांच्या वयाच्या अठराव्या महिन्यापासून पडण्यास सुरुवात होते, हे किमान पाच वर्षांच्या वयांपर्यंत सुरू राहते. पटाशीच्या मध्य दातापासून दात बदल व्हायला सुरुवात होते.
 • उपदाढा आणि दाढा यांचे निरीक्षण प्रामुख्याने लाकडी किंवा लोखंडी चिमट्याच्या साह्याने करावे. जनावराच्या खालच्या जबड्यातील पटाशीचे दात आणि उपदाढेमध्ये असलेल्या जागेत बोट घालून जबडा उघडणे शक्य आहे. पण आपले बोट जनावराच्या जबड्यात सापडल्यास इजा होण्याची शक्यता असते.
 • संपर्क : डॉ. शिल्पा मोडेकर, ९४२२२९०५५५ (पशू शरीररचना शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.