
दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा शास्त्रज्ञांकडून मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. त्या तुलनेमध्ये कालवडीवरील विस्तृत अभ्यास कमी झालेले आहे. उलट लहान असताना गाईंवर उष्णतेच्या ताणांचे होणारे विपरीत परिणाम संपूर्ण आयुष्यभरच नव्हे, तर पुढील पिढ्यांपर्यंतही भोगावे लागत असल्याचा दावा फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष जेडीएस कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत. उष्णतेच्या ताणामुळे लहान कालवडींच्या एकूण व अवयवांची वाढ विशेषतः प्रतिकाशक्तीशी संबंधित अवयवांवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला. गाईंच्या प्रसूतीदरम्यान नर वासरांवरील उष्णतेच्या ताणांमुळे पेशीय पातळीवरील परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या प्रयोगदरम्यान होलस्टीन गर्भवती गाईला फ्लोरिडा येथील उन्हाळ्यातील उष्णतेचा ताण निर्माण करण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिची आणि तिच्या वासरांच्या नोंदी घेण्यात आल्या. तुलनेसाठी अन्य एका होलस्टीन गर्भवती मातेसाठी तापमान योग्य प्रकारे नियंत्रित ठेवण्यात आले. ज्या मातेला उष्णतेचा ताण दिला होता, तिचे पिल्लू कमी वजनाचे झाले. त्यातही त्याच्या प्रत्येक अवयवांचे उदा. ह्रदय, यकृत, किडनी, थायमस, स्प्लीन इ. वजन अपेक्षेपेक्षा कमी आले. आतड्यातील पेशींच्या मृत्यूचा दरही त्यांच्यामध्ये अधिक होता. गाईंच्या गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळापासून उष्णतेचा ताण असल्यास नाळेची (प्लॅसेंटा) कार्यक्षमता कमी राहत असावी. त्यामुळेच गर्भाचा विकास कमी होतो. वासरांच्या वजन व अवयवांच्या वजनामध्ये घट येत असावी. त्याच प्रमाणे प्रसूती लवकर होण्याचा धोका असल्याचे सूतोवाचही संशोधक करतात.
अन्य सर्व प्राण्यांप्रमाणेच गाईंच्या पिल्लांमध्येही सुरुवातीच्या अवस्थेत मृत्यूचा आणि विकृती निर्माण होण्याचा दर अधिक असतो. वेळेपूर्वी झालेल्या प्रसूतीमध्ये या धोक्यात आणखीनच वाढ होते. पिल्लांची विशेषतः भविष्यातील प्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत अवयवांची वाढ योग्य प्रकारे न झाल्यास त्याचे नुकसान पिल्लाच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये भोगावे लागते. इतकेच नाही तर त्यांच्या पुढील पिढ्यांनाही भोगावे लागू शकते. - जियोफ्रे इ. दाल (Dahl), संशोधक, फ्लोरिडा विद्यापीठ.
निष्कर्ष
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.