जनावरांतील जिवाणूजन्य आजार

जनावरांना जिवाणूजन्य आजार होतात. या आजारांमुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. या आजारांची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
Bacterial
Bacterialagrowon

फऱ्या :
- या आजारास एकटांग्या नावाने ओळखतात. आजारास कारणीभूत जिवाणू मांसल भागामध्ये वाढतात.
- आजार गाई, बैल, म्हशींमध्ये आढळतो. विशेषत: लहान वयाच्या जनावरांमध्ये दिसतो.
कारणे :
- जिथे पाणी साचते, दलदल असते या ठिकाणी चरणाऱ्या जनावरांमध्ये आजार होतो. त्यांच्या मार्फत इतर जनावरांमध्ये प्रसार होतो. दूषित पाणी, चारा आणि बाधित जनावरांच्या तोंडातील जखमांद्वारे प्रसार होतो.
लक्षणे :
-आजारी जनावरास सुरुवातीला खूप ताप येतो.
- जनावरे पुढचा पाय उचलून धरतात.
- फऱ्याच्या मांसल भागामध्ये सूज येते. ती दाबल्यास चरचर आवाज येतो.
- सुजलेला भाग काळसर पडतो.
- वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावते.
उपचार
आजारी जनावरांना पशुतज्ज्ञांकडून प्रतिजैविकाचे इंजेक्शन द्यावे लागते.
प्रतिबंधक उपाय :
- लस पावसाळ्यापूर्वी जनावरांना टोचून घ्यावी.

घटसर्प :
- आजारास गळा सुजी या नावाने ओळखतात. वासरांमध्ये आजार तीव्र स्वरूपात आढळतो. मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
कारणे
- आजाराचे जिवाणू जमिनीत राहतात. योग्य वातावरणात हे जिवाणू नाकपुड्यातून श्‍वसन नलिकेत जातात.
- मलमूत्र व नाकातून वाहणाऱ्या स्रावामुळे वैरण आणि चराऊ रान दूषित होऊन प्रसार होतो.

लक्षणे:
- खूप ताप येतो. चारा पाणी बंद करतात.
- घशाला सूज येते. श्‍वसनाचा वेग वाढतो.
- डोळे लाल होतात. नाकातून रक्तस्राव वाहतो.
- पातळ रक्ताची संडास होते, जनावरे दगावतात.
औषधोपचार :
- जनावरांना प्रतिजैविक इंजेक्शन द्यावे. ताबडतोब दवाखान्यात न्यावे.
प्रतिबंधक उपाय :
- सर्व जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी.
--------------------------

Bacterial
गोचीड नष्ट करण्याचे जैविक उपाय

फाशी
- आजारास काळपुळी म्हणतात. या आजारात काही लक्षणे दाखवण्यापूर्वीच जनावरे तडफडून मरून जातात.
कारणे:
- आजारी जनावरांचे डोळे, नाक, तोंड आणि मलमूत्रातून निघणाऱ्या स्रावातून चराऊ कुरण दूषित होऊन प्रसार होतो. जनावरांच्या जखमांमधून प्रसार होतो.
लक्षणे:
- जनावरास ताप येतो. पोटात त्रास होतो. जनावर थरथर कापते.
जनावराचे पोट फुगते. तोंड, नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होतो.
- आजारी जनावराचे रक्त गोठत नाही.
औषधोपचार :
- आजारी जनावरे वेगळी बांधावीत. तातडीने उपचार करावेत.
प्रतिबंधक उपाय :

- सर्व जनावरांना पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.
--------------------------
गर्भपात:
- हा आजार सर्व जनावरांमध्ये आढळतो. आजारास ब्रुसेलोसिस म्हणतात.
लक्षणे:
- आजारी जनावरांमध्ये वारंवार गर्भपात होतो.
- योनीवाटे तपकिरी, पिवळसर किंवा चॉकलेटी रंगाचा स्राव वाहतो.
औषधोपचार :
- पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

गर्भपात:
- हा आजार सर्व जनावरांमध्ये आढळतो. आजारास ब्रुसेलोसिस म्हणतात.
लक्षणे:
- आजारी जनावरांमध्ये वारंवार गर्भपात होतो.
- योनीवाटे तपकिरी, पिवळसर किंवा चॉकलेटी रंगाचा स्राव वाहतो.
औषधोपचार :
- पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.
----------------------------------
धनुर्वात
- आजाराचे जिवाणू जनावरांच्या विष्टेमध्ये आढळतात.
- जनावराला जखम झाल्यास त्या जखमेतून जिवाणूंचा जनावरांच्या शरीरात प्रवेश होतो.

लक्षणे
- जनावरांना योग्य पद्धतीने श्‍वसन करता येत नाही.
- कान, शेपूट, मान ताठ होते. जबडा उघडता येत नाही.
- जनावराचे पोट फुगते, ताठरत जाते.
--------------------
आंत्रविषार :
- हा आजार, शेळ्या, मेंढ्यांना होतो. आजारास कारणीभूत जिवाणू जमीन आणि जनावरांच्या आतड्यात राहतात.
- दूषित चारा, पाण्यामुळे हे जंतू जनावरांच्या पोटात एक प्रकारचे आंतरिक विष निर्माण करतात. याचा शरीरात प्रसार वाढतो.

लक्षणे
- आजारी जनावरे सुस्त होतात. पातळ संडास लागते.
- आतड्यांमध्ये विष निर्माण झाल्यामुळे जनावरांच्या आतड्यात दाह निर्माण होऊन रक्तमिश्रित संडास होते.
- पोट गच्च होऊन जनावरे कळ देते.
-उभे राहता येत नाही, जनावर आडवे पडून राहते.

औषधोपचार :
आजारी जनावरांना तातडीने उपचार सुरू करावेत.
प्रतिबंधक उपाय :-
पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांना लसीकरण करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com