मध निर्यातीला चालना देण्यावर अपेडाचा भर

भारताने २०२०-२१ या वर्षात ७१६ कोटी रुपयांच्या मुल्यासह ६० हजार टन नैसर्गिक मधाची निर्यात केली आहे. या निर्यातीत एकट्या अमेरिकेचा वाटा ४४ हजार ८८१ टन म्हणजेच जवळपास ७५ टक्के इतका आहे.
Honey Export
Honey Export

पुणे - युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या निर्यातीसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी अपेडा (Agricultural and Processed Food Products Export Development Authority ) ही संस्था शेतकरी आणि राज्य सरकारांसोबत मिळून काम करत आहे. युके, युरोपियन युनियन आणि दक्षिण पूर्व आशिया आणि इतर देशांत निर्यातीला चालना देण्यावर अपेडा भर देत आहे. यासाठी अपेडा राज्य सरकारे, शेतकरी आणि इतर भागधारकांसोबत काम असल्याचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी सांगितले आहे. 

मधाच्या निर्यातीला (Honey Export) चालना देण्यासाठी विविध देशांनी लादलेल्या शुल्क रचनेवरही भारत पुन्हा चर्चा करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भारताने २०२०-२१ या वर्षात ७१६ कोटी रुपयांच्या मुल्यासह ६० हजार टन नैसर्गिक मधाची निर्यात केली आहे. या निर्यातीत एकट्या अमेरिकेचा वाटा ४४ हजार ८८१ टन म्हणजेच जवळपास ७५ टक्के इतका आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश आणि कॅनडा या काही प्रमुख देशांनाही भारतातून मध निर्यात होते. 

जागतिक बाजारात भारताचे स्थान - 

भारतीय मधाची निर्यात १९९६-९७ मध्ये सुरू झाली असली तरी २०२० पर्यंत सात लाख ३६ लाख टन निर्यातीसह जागतिक व्यापारात (World Trade) भारताचे स्थान नवव्या स्थानावर होते. याशिवाय जागतिक मध उत्पादनामध्ये भारत आठव्या क्रमांकावर आहे. चीन, तुर्की, कॅनडा, अर्जेंटिना, इराण आणि अमेरिका हे प्रमुख मध उत्पादक देश असून ते एकत्रितपणे जागतिक उत्पादनात निम्मे योगदान देतात. 

APEDA मध उत्पादकांना (Honey Producer) विविध योजना, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि प्रयोगशाळा (Labrotory) चाचणी अंतर्गत सरकारी सहाय्य मिळवण्याबरोबरच निर्यात बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा देत आहे. असे अंगमुथू यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च, मध निर्यात हंगामातील मर्यादित कंटेनरची (Container) उपलबद्धता आणि प्राधान्यक्रमावर अपुरे निर्यात प्रोत्साहन (Export incentives) या सारख्या समस्या निर्यात एजन्सी अधोरेखित करत आहेत. असहे ते म्हणाले. 

व्हिडीओ पाहा - 

शरिरातील प्रतिकारशक्ती (Immunity) वाढविणारा आणि साखरेला (Sugar) आरोग्यदायी पर्याय म्हणून स्विकरल्यानंतर मधाच्या निर्यातीत मोठी क्षमता आहे. विशेषत: कोविड (Covid) साथीच्या आजारानंतर जागतिक स्तरावर मधाचा वापर वाढल्याचे अपेडाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. देशांतर्गत उत्पादनाच्या निम्मा मध देशातच वापरला जातो. तर उर्वरित मधाची निर्यात केली जाते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com