बायोगॅस संयंत्राची काळजी, देखभाल

बायोगॅस हे अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत असून, त्यापासून प्राप्त स्वच्छ व स्वस्त इंधनाचा वापर मुख्यत: स्वयंपाकासाठी केला जातो. त्याची उभारणी आणि पुढील देखभाल वेळोवेळी योग्य प्रकारे केल्यास त्यातून इंधनाची सोय होते.
बायोगॅस संयंत्राची काळजी, देखभाल
Biogasagrowon

बायोगॅस संयंत्राचे प्रमुख दोन प्रकार आहेत.
१) तरंगते वायुपात्र असलेले (केव्हीआयसी)
२) स्थिर घुमट असलेले (जनता व दीनबंधू)

उभारणी करताना घ्यावयाची काळजी :
-बांधकामाचे नियोजन करून खड्डा खोदण्यास सुरुवात केल्यापासून जनावराचे शेण वेगळे गोळा करण्यास सुरुवात करावी. बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्या ३० ते ४० दिवसात सुरुवातीला भरावयाचे शेण उपलब्ध होईल.
-सयंत्राच्या बांधकामावर १५-२० दिवस पाणी टाकावे. बांधकाम पक्के होईल.

उभारणी पूर्ण झाल्यावर घ्यावयाची काळजी :
-सुरुवातीचे शेण व त्यामध्ये तितकेच पाणी मिसळून सयंत्राला एक किंवा दोन दिवसांत पूर्ण भरावे. थोडे थोडे भरत जाऊ नये.

संयंत्राची देखभाल व दुरुस्ती
-दररोज ठरलेल्या प्रमाणात शेण-पाणी मिश्रण सयंत्रामध्ये घालीत जावे.
-शेणटाकीमधील गाळ कुंडीतील साचलेले दगड, माती काढून शेणटाकी रोज स्वच्छ करावी.
-इनलेट व आउटलेट मधून खत वाहत नसेल तर तो भाग बांबूने मोकळा करावा.
-मुख्य गॅस कॅप(Gas cap) रोज रात्री बंद करावी.
-गॅस(gas) शेगडी पेटविताना प्रथम आगकाडी पेटवावी नंतर गॅस कॉक चालू करावा.
-गॅसची स्वच्छता करताना मुख्य कॉक बंद करून शेगडी काढावी. नोझल व पाइप तारेने साफ करावेत.
-गॅसची ज्योत निळी दिसत असली किंवा शेगडीत डबडब असा आवाज येत असल्यास पाइपमध्ये पाणी झाले, असे समजून मुख्य कॉक बंद करावा. ‘टी’ पाइपचे बूच खोलून पाणी काढावे. पुन्हा बूच लावावे.
-गॅस ज्वाला नोझलला चिटकून दीड ते दोन इंच उंचीच्या याव्यात. यापेक्षा उंच ज्वाला येत असतील तर ऑक्सिजन(Oxygen) कमी जास्त करणारी चकती मागे पुढे सरकवून ज्वाला योग्य उंचीच्या ठेवाव्यात.
-काही कारणाने गॅस खुला राहिल्यास त्याच्या तीव्र वासाने गॅस मोकळा राहिल्याची जाणीव होते. अशा वेळी प्रथम दरवाजा खिडक्या उघडून गॅस बाहेरील हवेत जाऊ द्यावा. गॅस हवेपेक्षा हलका असल्याने तो लगेच दरवाजा-खिडक्यातून निघून जाईल.
-हंगामानुसार गॅस ठरलेल्या प्रमाणात तयार होतो. हे लक्षात घेऊन गॅसचा वापर काटकसरीने करावा. गॅस वाया जाऊ देऊ नये.

Biogas
बाजार समितीच्या निवडणुकांची लगीनघाई

संयंत्रातून अधिक गॅस कसा मिळवावा?
-शक्यतोवर प्लँटवर १२ तास ऊन पडेल अशी जागा निवडावी.
-जागा मुरमाड अगर चुनखडीची असल्यास त्या ठिकाणी बायोगॅस प्लँट बांधावा.
-प्लांटची खोली शक्यतोवर कमी असावी.
-बायोगॅस(biogas) प्लांटला आतून प्लॅस्टर करावे. पार्टिशन भिंत असल्यास ती कमी जास्त जाडीची असावी. म्हणजे प्लांटमध्ये जिवाणू अधिक राहतील.

बायोगॅस प्लांटमधील दोष निदान व दुरुस्ती
गॅस कमी मिळण्याची कारणे -
१) ठरलेल्या प्रमाणात दररोज शेण न घालणे.
२) शेणामध्ये कमी अगर अधिक प्रमाणात पाणी घालणे.
३) शेणामध्ये गुरांचे मूत्र अधिक प्रमाणात मिसळणे.
४) बायोगॅस प्लांटमधील मिश्रणात काही कारणाने सामूचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे.
५) गॅस टाकीला बारीक भोके पडून त्यामधून गॅस निघून जाणे.
६) थंडीच्या दिवसांत जिवाणूंची संख्या कमी होणे.
७) प्लांटमध्ये साबण, फिनाईल, आम्ल इ. जंतुनाशके टाकणे धोक्याचे आहे.
८) गॅस टाकीचे वजन ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी अधिक असणे.
९) गॅस वाहक पाइप कमी व्यासाचा आणि प्रमाणापेक्षा जास्त लांबीचा असणे.
१०) पाइप वेडावाकडा बसविल्याने त्यामध्ये वाफेचे पाणी साचत राहणे.

बायोगॅस प्लांट नादुरुस्त का होतो?
-पाया भरणी पुरेशी न झाल्यास.
-काँक्रीट मिश्रण योग्य प्रमाणात न झाल्यास.
-ठरलेल्या मापात बांधकाम न झाल्यास.
-बांधकामात किमान दोन ते तीन आठवडे पाण्याचा वापर न झाल्यास.
-बांधकामात वापरावयाचे समान चांगल्या प्रतीचे न वापरले गेल्यास.
-बांधकाम करणारा गवंडी पुरेसा कुशल, कसबी नसल्यास.
-बांधकामाच्या बाजूने वाळू, दगड, विटाचे तुकडे, मुरूम व पाणी यांचे मिश्रण भरून जमीन व बांधकाम यामधील मोकळी जागा न भरल्यास प्लाट फुटण्याचा धोका असतो.


अजय गव्हांदे, ९९२२६६८९४७
(सहाय्यक प्राध्यापक, नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com