गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्या

संसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच माणसांमध्येही दिसून येतो.
Brucellosis in animal
Brucellosis in animal

संसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच माणसांमध्येही दिसून येतो. जनावरांना या रोगाची बाधा चारा, खाद्य आणि पाणी यातून होत असते. या रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतो.

गर्भपाताची लक्षणे- गाभण गायी-म्ह्शीमध्ये गर्भ ४ ते ९ महिन्याचा आणि शेळ्या-मेंढ्यामध्ये गर्भ २ ते ५ महिन्याचा असताना गर्भपात होतो. गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते, गर्भाशयातून रक्तमिश्रित स्त्राव येतो. गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावरांची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. दूध उत्पादनात घट होऊन, जनावरांमध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांझपणा येण्याची दाट शक्यता असते. या आजाराचा प्रसार प्रामुख्याने निरोगी जनावरे बाधित जनावरांच्या जननेंद्रियांच्या संपर्कात आल्याने होत असतो. दूषित वीर्याच्या माध्यातूनही निरोगी गायी-म्हशींना या आजाराचा प्रादुर्भाव होतो. दूषित स्त्रावांचे थेंब उडल्याने डोळ्यांच्या श्र्लेष्म त्वचा, जखमांच्या संपर्कात आल्याने तसेच दुधावाटे प्रसार होतो.

रोगप्रतिबंधात्मक उपाय- गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे. बाधित जनावरांना ऊर्जायुक्त, प्रथिनयुक्त आहार द्यावा. कळपामध्ये या आजाराचे प्रमाण १० % किंवा त्याहून अधिक असल्यास नव्याने  जन्मला  येणाऱ्या ६ ते ८ महिन्याच्या मादी वासरांना गर्भपाताविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.

जनावरांमध्ये होणारा गर्भपात हा संसर्गिक आजार असल्यानं बाधित जनावरांकडून माणसाला देखील या रोगाची बाधा होत असते, यामुळे विशेष काळजी घेण गरजेचं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com