स्टायलो घासाची लागवड कशी करावी?

स्टायलो गवत द्विदलवर्गीय असून बहुवार्षिक आहे. ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी या गवताची लागवड करावी.
Cultivation practices of stylo grass
Cultivation practices of stylo grass

स्टायलो गवत द्विदलवर्गीय असून बहुवार्षिक आहे. ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी या गवताची लागवड करावी. या गवताचा पाला रसदार असतो. या चारा पिकांची वनशेतीमध्ये आंतरपीक म्हणून लागवड केली जाते.

हेही पाहा- जनावरांसाठी तयार करा चारा पेढी

  • गवत सरळ वाढणारे असून यास जास्त फुटवे येतात. 
  • ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी या गवताची लागवड करावी. 
  • गवताला जमीन ही माळरान, पडीक मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी लागते.
  • गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे १२ ते १५ टक्के असते.  
  • लागवडीसाठी स्टायलोसन्थेस हमाटा (Stylosthenses hamata), स्टायलोसन्थेस स्कब्रा  (Stylosthenses scruba) या दोन जातींची लागवड करावी.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (MPKV, Rahuri) स्टायलो गवताची (Stylo Fodder)  फुले क्रांती (phule kranti) ही जात प्रसारित केली आहे.
  • लागवडीचे तंत्र

  • प्रती हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते.
  • बीज प्रक्रिया करत असताना बियाणे गरम पाण्यात ३ ते ४ मिनिटे भिजवून घ्यावे. 
  • लागवड ३० x १५ सेंमी अंतरावर करावी. बियाणे जास्त खोलीवर टाकू नये, कारण त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होतो.
  • लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळावे. तसेच प्रति हेक्टरी २० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे. 
  • उत्पादन 

  • पेरणी केल्यापासून ३ ते ४ महिन्यांनी जमिनीपासून १० ते १५ सेंमी उंचीवर पहिली कापणी करावी. 
  • कोरडवाहू क्षेत्रामध्ये हिरव्या चाऱ्याचे  १५ ते २० टन आणि बागायती क्षेत्रामध्ये ३०-३५ टन उत्पादन मिळते. 
  • वनशेती करत असताना वेगवेगळ्या गवताची आंतरपीक (Intercropping) म्हणून लागवड करता येते. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे तसेच ज्यांच्याकडे सिंचन सुविधा आहे अशा ठिकाणी स्टायलो गवताची आंतरपीक म्हणून लागवड करावी. यामुळे जनावरांना पौष्टिक चारा मिळण्यास मदत होईल.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com