हैद्राबादी बिर्याणीसाठी या मेंढीचे मटण वापरले जाते !

महाराष्ट्रात शेळी आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मेंढीपालन महाराष्ट्रामध्ये करत असताना ते लोकरीसाठी न करता मांस उत्पादन घेण्यासाठी जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे तसं आपण आपल्याकडे मेंढ्याचे मांस उत्पादनासाठीच संगोपन करत असतो. पण काहीसा शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणे ही तितकेच गरजेचे आहे.
Deccani sheep mutton used in hyderabadi mutton biryani
Deccani sheep mutton used in hyderabadi mutton biryani

महाराष्ट्रात (Maharashtra) शेळी आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मेंढीपालन महाराष्ट्रामध्ये करत असताना ते लोकरीसाठी न करता मांस उत्पादन घेण्यासाठी जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे तसं आपण आपल्याकडे मेंढ्याचे (sheep) मांस (Mutton) उत्पादनासाठीच संगोपन करत असतो. पण काहीसा शास्त्रीय दृष्टीकोन (Scientific Approach)  ठेवणे ही तितकेच गरजेचे आहे. हेही पाहा -Government of Maharashtra राबवणार Community Goat Scheme

पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी ( COVAS, Parbhani)  मार्फत गेल्या तीन वर्षापासून मार्चमध्ये डेक्कनी वार्षिक महोत्सव (Deccani Annual Celebration) साजरा केला जातोय. डेक्कनी मेंढ्याचे संगोपन मराठवाड्यात (Marathwada) मोठ्या प्रमाणात केलं जात. ही जात प्रामुख्याने मटणासाठी वापरली जाते. परभणी (Parbhani), औरंगाबादसारख्या (Aurangabad) उष्ण तापमान असलेल्या शहरात ही मेंढी चांगला तग धरून राहू शकते. या मेंढीची जास्त अंतरावर चरण्याची क्षमता असून ती काटक आहे. हेही वाचा- मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रक आपले शासनही शेळी-मेंढी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आणत आहेत. यात राष्ट्रीय पशुधन योजनेंतर्गत (National Livestock Mission) ५०० शेळ्या किंवा मेंढ्यांसोबत २५ नर बोकड किंवा मेंढ्याचं वाटप केलं जाते. ५० टक्के अनुदानावर शेतकरी बचत गट किंवा एकटे शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सोबतच अलीकडील काही वर्षात प्रत्येक महसूल विभागात (Revenue Department) एक शेळी-मेंढीच्या समुहाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनांतर्गत महाराष्ट्राला शेळ्या-मेंढ्याच्या संख्येमध्ये पहिल्या तीन (Three) क्रमांकामध्ये न्यायचं आहे.

हेही वाचा- गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवड डेक्कनी मेंढीला विशेषतः मटणाला खुप जास्त मागणी तेलंगणामध्ये आहे. हैद्राबादी बिर्याणीच्या चवीमध्ये डेक्कनी मेंढीच्या मटणाचा वापर केला जातो. त्यामुळे  हैद्राबादी मटण बिर्याणीला इतर राज्याबरोबरच इतर देशातही प्रचंड मागणी आहे. केवळ मेंढीमुळे तेलंगणाचे अर्थकारण बदललं आहे. त्यामुळेच राजस्थान शेळ्या-मेंढ्याच्या संख्येमध्ये प्रथम क्रमांकावर असूनदेखील तेलंगणा (Telangana) राज्याने राजस्थानला मागे टाकले. कारण तेलंगणा राज्याने शेळ्या-मेंढ्यासाठी बिझनेस आयडिया (Buisness Idea) आणल्या ज्यामुळे तेथील स्थानिक लोकांचे अर्थकारण बदलेले गेले. आपल्याकडेही या मेंढपालकांना आर्थिक आणि सामाजिक स्थिरता दिली तरच आपल्याकडील मेंढ्या टिकून राहून त्यांचे जतन होईल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी स्थलांतरीत होणाऱ्या लोकांना आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. त्यांना विमा संरक्षणाच्या सोयी दिल्या पाहिजे. स्थलांतरीत लोकांच्या मेंढ्यांना पिपिआरचे लसीकरण, जंतनिर्मुलन या सारख्या सुविधा, तसेच नियमित पशुवैद्यकीय सेवांचा लाभही मिळत नाही. यावर प्रयत्न करायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com