थंडीत खा अंडी

अंड्यामध्ये Tryptophan नावाचा अमिनो ॲसिड असते. Tryptophan मुळे ताण तणाव कमी होऊन मूड चांगला राहतो.
थंडीत खा अंडी
Egg Help To Reduce Stress

रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि तुमच्या शरीराची सर्व प्रकारची गरज भरून काढेन असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? उत्तर सोप्पंय.तुम्ही रोज १ ते २ अंडी खाऊन हि अडचण दूर करू शकता. बरं आज आपण अंड का खावे ? तेही थंडीत याबद्दल जाणून घेऊया. अंड खाल्ल्याने वजन वाढते? तर नाही.  रोज सकाळी नियमित, अंड्याच सेवन केल्यास आपले वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी दोन अंडी खाल्ल्यास कमी प्रमाणात कॅलरीज घेऊनसुद्धा आपले दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते. वाटते न...

एक खरं सांगाल का? तुम्हाला खुश राहायला आवडेल का? आहो..मग अंडी खा कि..तर अंड्यामध्ये Tryptophan नावाच अमिनो ॲसिड असते. Tryptophan मुळे ताण तणाव कमी होऊन मूड चांगला राहतो. याचाच अर्थ. अंड्याचा आहारात समावेश केल्याने तुम्ही आनंदी राहण्यास मदत होईल.

थंडी म्हटली की गरमागरम चहा-भजी, थोडक्यात काय? उष्ण गोष्टी खाव्याशा वाटतात कारण  तशी उष्णतेची गरज थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला देखील असते. थंडीत आपले पोट थंड राहत असल्याकारणाने सतत भूक लागत असते. यासाठी आहारात पालेभाज्या व दुधासोबत. अंड्याचा समावेश करणे ही गरजेचं आहे. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक स्वास्थ्यासाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

अंडी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्रोत आहे. अंड खात असताना फक्त उकडलेलं अंड खाल्ल पाहिजे असं काही नाही बर. तर आपण अंड्यापासून अनेक पाककृती बनवून त्याचा आहारात समावेश करू शकतो. उकडलेल्या अंड्यांमध्ये हेल्दी फॅट असतं, जे वजन वाढू देत नाही. याशिवाय, प्रथिनं मुबलक प्रमाणात असल्यामुळं शरीरातील तुटलेल्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी याचा उपयोग होतो. थंडीच्या दिवसात वातावरण दमट असल्याने, अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये असलेलं व्हिटॅमिन डी असल्यानं सर्दी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी फायद्याचे आहे. अंडी शरीराला ऊर्जा खूप लवकर पुरवतात. दिवसातील एक अंड तुम्हाला डॉक्टरांना दूर ठेवू शकते. म्हणून सांगते थंडीत खा अंडी...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.