Poultry Industry: पोल्ट्री क्षेत्रात रोजगाराच्या संधी

पोल्ट्री उद्योगातील उलाढाल २०२७ पर्यंत ३,१७,००० कोटींवर जाण्याची शक्यता. (Poultry Industry)
Poultry
Poultry Agrowon

भारतातील कुक्कुटपालन उद्योग (Poultry) एक गतिमान आणि वेगवान क्षेत्र म्हणून उदयास येतोय. दरवर्षी सुमारे ५ लाख लोक या उद्योगात प्रवेश करू शकतात. हा उद्योग वर्षाला ८ ते १० टक्क्यांनी वाढतो आहे. मात्र या उद्योगात असणाऱ्या संधींबाबत मुलांमध्ये जागरूकता नसल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

आजही ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी या उद्योगात यायला संकोचतात. कारण त्यांना हा उद्योग फायदेशीर वाटत नाही. मात्र प्रत्येक व्यवसायाला स्वतःचं एक वलय असतं. या उद्योगात दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांना समाविष्ट करून घेण्याची क्षमता आहे. एकट्या तामिळनाडूमध्ये दरवर्षी सुमारे ४०,००० लोकांची गरज भासते, परंतु तुलनेने फारच कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे.

पोल्ट्री क्षेत्रात (Poultry Industry) सध्या राष्ट्रीय स्तरावर जवळपास १ हजार प्रमुख उद्योजक आहेत. शिवाय विभागीय आणि प्रादेशिक स्तरावरील उद्योजकांची संख्या वेगळीच आहे. पोल्ट्री उद्योगाच्या शेती व्यवस्थापन, हॅचरी व्यवस्थापन, ब्रीडर व्यवस्थापन, खाद्य आणि उत्पादन यासह सर्वच क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी आहे. खाद्य पोषण उत्पादक आणि अँनिमल लाईफ सायन्स यांसारख्या संबंधित उद्योगांनाही मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

शालेय पातळीवर याची जनजागृती व्हायला हवी. मागच्या काही वर्षात जेव्हा एखादा विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घ्यायचा तेव्हा "फक्त स्वयंपाक शिकण्यासाठी" हा कोर्स असतो असा लोकांचा समज असायचा. पण हा गैरसमज नंतर बदलला कारण यातल्या इतर शाखांची लोकांना ओळख झाली.

अगदी असंच पोल्ट्री उद्योगाबाबतही (Poultry Industry)आहे. लोकांना पोल्ट्री उद्योग म्हणजे कोंबड्या पाळणे असंच वाटतं. पण यातही वैविध्य आहे. आम्ही शाळांमध्ये जाऊन मोहीम राबवत आहोत. पोल्ट्रीमुळे रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात असा संदेश देत आहोत. विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाही. हा एक असा उद्योग आहे जिथे विद्यार्थी ग्रामीण भागात राहून यशस्वी होऊ शकतो.

२०२१ मध्ये भारतीय पोल्ट्री मार्केटची (Poultry Market) उलाढाल १,७०,८०० कोटी इतकी होती. २०२७ पर्यंत ही उलाढाल ३,१७००० कोटींवर जाण्याची शक्यता IMARC समुहाने व्यक्त केली आहे. ही वाढ एकूण १०.५० टक्क्यांपर्यंत असेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com