जनावरांमधील आंत्रविषार आजार

जनावरांना आंत्रविषार रोग होण्याचं प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात जनावरांना आंत्रविषार हा आजार होण्याचा धोका असतो. हा आजार क्‍लॉस्ट्रिडीयम परफ्रिजन्स नावाच्या जिवाणूंमुळे होतो.
जनावरांमधील आंत्रविषार आजार
Entertoxemia in animals

जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात होणाऱ्या आजारापैकी आंत्रविषार (Enterotoxemia) हा एक आजार आहे. आंत्रविषार रोगाचा जीवाणू प्रामुख्यानं जमिनीत, जनावरांच्या आतड्यात वास्तव्य करतो. हा रोग शेळ्यां मेंढ्यापेक्षा करडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. चांगल्या पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव शेळ्या मेंढ्यांना याची लवकर बाधा होते.

आंत्रविषार म्हणजे काय ?

हा आजार “ क्‍लॉस्ट्रिडीयम परफ्रिजन्स” ( Clostridium perfringens) नावाच्या जीवाणूंमुळे (bacteria) होतो. या जीवाणूजन्य आजारामध्ये शेळ्या-मेंढ्यामध्ये आतड्याचा दाह होतो... करडांमध्ये याचे प्रमाण जास्त असते... पावसाळ्यात उगवलेला हिरवा कोवळा चारा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्याने या आजाराची बाधा होते...

पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा शेळ्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खातात. हिरव्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तसेच हिरवा चारा जास्त खाल्ल्याने जनावरांचे पोट गच्च भरते.

हेही पाहा-

आंत्रविषाराची लक्षणे - १) या रोगाची लक्षणे खूप कमी कालावधीसाठी दिसतात. २) चरायला गेलेल्या मेंढ्या अचानक मलुल आणि सुस्त होऊन त्यांना पातळ हगवण लागते. ३) आतड्याचा दाह झाल्याने हगवणीतून रक्त पडते.   ४) शेळ्या-मेंढ्या पोटात कळा आल्यामुळे पाय सतत झाडत, गोल फिरून प्राण सोडतात.

हेही पाहा-

\

आंत्रविषार आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार - १) या रोगावरील उपलब्ध इटीव्ही लस (vaccine) मान्सूनपूर्व म्हणजे १५ जूनपर्यंत आणि मान्सूननंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी पशुवैद्कामार्फत वर्षातून दोन वेळा टोचून घ्यावी. २) रोगाची बाधा झाल्यानंतर पशुवैद्काच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत. ३) शेळ्या-मेंढ्यांना कोवळे लुसलशीत गवत अधिक प्रमाणात खाण्यास देऊ नये.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.