शेतकरी नियोजन : वेलवर्गीय भाजीपाला

माझी पालखेड मिरची (जि.नाशिक) येथे ३ एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरावर कारले लागवड आणि उर्वरित क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग आहे. मागील ३ वर्षांपासून कारले पिकाचे उत्पादन घेत आहे.
Vegetable
VegetableAgrowon

शेतकरी : संतोष रामभाऊ खैरे

गाव : पालखेड मिरची, ता.निफाड, जि.नाशिक

एकूण क्षेत्र : ३ एकर

कारले लागवड : दीड एकर

माझी पालखेड मिरची (Chili) (जि.नाशिक) येथे ३ एकर शेती आहे. त्यापैकी दीड एकरावर कारले (Bitter Gourd) लागवड आणि उर्वरित क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग आहे. मागील ३ वर्षांपासून कारले पिकाचे उत्पादन (Bitter Gourd Production) घेत आहे. त्यापूर्वी संपूर्ण क्षेत्रावर द्राक्ष लागवड होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे तयार द्राक्ष मालाचे (Grape) नुकसान, दरातील अस्थिरता आणि कोरोनामुळे प्रभावित झालेली बाजारपेठ या कारणांमुळे द्राक्ष लागवड कमी करण्याची निर्णय घेतला. त्यानंतर २०१९ साली विविध भाजीपाला पिकांचा अभ्यास करून कारले या वेलवर्गीय पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीपूर्वी वाण निवड, लागवड पद्धती, कीड-रोग व्यवस्थापन (Pest Disease Management) आणि विपणन पद्धतीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानुसार उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत कारले लागवड केली.

शेतीकामांमध्ये आई सत्यभामा, वडील रामभाऊ आणि पत्नी सुनीता यांची मोठी मदत होते. त्यामुळे शेतीकामांचे नियोजन व व्यवस्थापन सुलभ होते. पीक व्यवस्थापनामध्ये के.के. वाघ कृषी महाविद्यालयातील प्रा. तुषार उगले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते.

व्यवस्थापनातील बाबी ः

 • - जानेवारी महिन्यात पूर्वमशागत करून शेत तयार करून घेतले.

 • - त्यानंतर अडीच फूट अंतराचे बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरूण घेतला.

 • - लागवडीपूर्वी डीएपी, १०:२६:२६, म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. तसेच एकरी ३० गोण्या सेंद्रिय खतांचा वापर केला.

 • - सिंचनासाठी इनलाईन पद्धतीने सव्वा फूट अंतरावर ठिबकच्या लॅटरल टाकल्या.

 • - रोपवाटिकेमध्ये रोपांची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार लागवडीसाठी तयार भरघोस उत्पादन देणाऱ्या रोगमुक्त रोपांची उपलब्धता केली.

 • - त्यानुसार दीड एकर लागवडीसाठी सुमारे बाराशे ते चौदाशे रोपे लागली. एक रोप साधारण ३.८० रुपयांना मिळाले.

 • - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ८.५ बाय ३ फूट अंतरावर रोपांची लागवड केली.

 • - ठिबक सिंचनातून १९:१९:१९, १२:६१ः००, ०:५२:३४, ०:०:५० या विद्राव्य खतांच्या आठवड्यातून २ वेळा मात्रा दिल्या जातात.

 • - वाढीच्या अवस्थेमध्ये नागअळी, फळ पोखरणारी अळी, फुलकिडे या किडींचा तसेच भुरी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक फवारण्या घेतल्या.

 • - साधारण १५ दिवसानंतर ताटीवर वेल चढविण्यास सुरुवात केली. त्यामुळे वेलींना वर चढण्यास आधार मिळतो. वेलीला आधार मिळण्यासाठी ताटी बांधून त्यावर वेल चढविण्यास सुरुवात केली. साधारण ४५ ते ५० दिवसांनंतर सगळ्या ताटी वेलींनी पूर्णपणे झाकून गेल्या. ताटी विकसित झाल्यानंतर मंडप पद्धतीने त्याच वेलीवर उत्पादन घेतले जाते.

काढणी व उत्पादन ः

 • - लागवडीनंतर ६० दिवसांनी कारले तोडण्यास सुरुवात होते.

 • - आठवड्यातून दोन वेळा तोड केली जाते. सुरुवातीच्या काळात उत्पादन कमी मिळते. त्यानंतर आठवड्यात एका तोड्यात एकरी ७० ते ८० क्रेट कारले उत्पादन मिळते.

 • - एकरी सरासरी १४०० ते दीड हजार क्रेट कारले उत्पादन मिळते. एक क्रेट साधारण १३ किलो वजनाचे भरते.

 • - सध्या सरासरी २०० ते २५० रुपये प्रति क्रेट इतका दर मिळतो आहे.

 • - कारले तोडणीनंतर प्रतवारी करून वाकडी पिकलेली कारली वेगळी काढली जातात.

 • - बाजारपेठेचा अंदाज घेईन नाशिक, ओझर, लासलगाव येथील व्यापाऱ्यांना विक्री केली जाते.

---------

संपर्क ः संतोष खैरे, ९९२१०८२५५३

(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com