
जनावरांना वर्षभर चांगल्या प्रतीचा संतुलित आहार (balance feed) दिल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहून, दूध उत्पादनात (milk production) सातत्य राहते. वर्षभर हिरव्या चाऱ्याची (green fodder) उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक हिरव्या चारा पिकाबरोबर हंगामी पिकांची देखील लागवड करावी. जनावरांना पूर्ण वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करणे, दिवसेंदिवस जिकरीचे बनत आहे.
उन्हाळ्यात चाऱ्याचे नियोजन करताना पहिल्यांदा आपल्याकडे किती जनावरे आहेत? एकूण जनावरांच्या संख्येपैकी शेतीकामासाठीची जनावरे, दुधाळ जनावरे, भाकड जनावरे, गाभण जनावरे तसेच लहान वासरे यांची वर्गवारी करून त्यांची रोजची चाऱ्याची गरज किती आहे? यावरून वर्षभर किती चारा लागेल यांचा अंदाज बांधायला हवा.
जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांच्या लागवडीबरोबर हंगामी चाऱ्याची सुद्धा लागवड करावी. बहुवार्षिक चारा पिकांची एकदा लागवड केली, बहुवार्षिक चारा पिकांमुळे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढते. सोबतच हंगामी चारा म्हणून मका, ज्वारी यांची लागवड करून मुरघास बनविल्यास, उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते. संकरित नेपिअर, मारवेल, स्टायलो यांसारख्या गवतांची लागवड केल्यांनतर उन्हाळ्यामध्ये मुबलक चारा उपलब्ध होऊ शकतो.
जनावरांना खाद्यचारा देताना वैविध्यपूर्ण आहार देणे आवश्यक असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. यात एकदल आणि द्विदल चारापिकांचा समावेश करावा. उन्हाळ्यात चारा व्यवस्थापनावर होणारा अधिकचा खर्च कमी करण्यासाठी आपल्या शेतातच जनावरांसाठी नियोजन करून चारा पिकवावा. नियोजनपूर्वक चारा पिकांची लागवड केल्यास उन्हाळा संपेपर्यंत चाऱ्याचा पुरवठा होऊ शकतो. उन्हाळ्यात चारा टंचाईचे भीषण संकट निर्माण होऊ नये म्हणून वैरणीचे कुशल व्यवस्थापन पशुपालकांनी अवगत करायला हवे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.