साजूक तूप म्हणजे काय?

भाकरी-तूप, वरण-भात-तूप खाण्याची संस्कृती आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे.
ghee
gheeAgrowon

भाकरी-तूप, वरण-भात-तूप खाण्याची संस्कृती आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. दुधावरील सायीला (cream) विरजण लावल्यावर तिचे दह्यात रुपांतर होते. हे दही पाणी टाकून रवीने घुसळल्यावर मिळते ते असते लोणी. हे लोणी कढवून त्यापासून तुपाची निर्मिती केली जाते. बरं मग नुसत्या तुपात अन साजूक तुपात (ghee) काय बरं फरक असतो? तर ताज्या लोण्यापासून बनविलेल्या तुपाला म्हटले जाते, साजूक तूप.

दुधाच्या सायीला घुसळून त्यापासून तयार झालेल्या लोण्यासारख्या पदार्थाला इंग्रजीमध्ये बटर म्हटले जाते. यामध्ये दोन टक्क्यांपर्यंत मीठ घातले जाते. परिणामी त्याची टिकवण क्षमता वाढते. काही वेळेस पिवळा रंग किंवा अॅनॅटो कलर घातला जातो. बटर पर्चमेंट पेपर आणि कार्डबोर्डमध्ये पॅकिंग करून कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवले जाते.

लोण्यामध्ये स्निग्धांशांचे प्रमाण जास्त असते. परंतु त्याखेरीज त्यात अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वेही असतात. लोण्यातील स्निग्धांश सहज विरघळणारे आणि पाचक असल्याने आरोग्यासाठी हिताचे असते. शेंगदाण्याच्या दुधापासून बनवलेल्या बटरला पीनट बटर म्हटले जाते.

ghee
दुधाच्या सायीपासून बनवा साजूक तूप

तूप तयार करताना लागणारा पायाभूत पदार्थ म्हणजे लोणी. खाऱ्या लोण्यामध्ये म्हणजे टेबल बटरमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण ८० टक्क्यांच्या जवळपास असते. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या तुपात स्निग्धाशांचे प्रमाण ९९.५ टक्क्यांच्या जवळपास असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com