जनावरांना द्या वजनानुसार खाद्य

जनावरांची पोषण तत्वांची गरज भरून काढणे महत्वाचे असते. अनेकदा जनावरांची वाढती पशुखाद्याची गरज भरून काढण्यासाठी बरेचसे पशुपालक घरच्या घरी पशुखाद्य तयार करतात. जनावरांना सतत गव्हाणी भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावरांच्या वजनाप्रमाणे खाद्य आणि चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते.
animal fodder
animal fodder

जनावरांची पोषण तत्वांची गरज भरून काढणे महत्वाचे असते. अनेकदा जनावरांची वाढती पशुखाद्याची गरज भरून काढण्यासाठी बरेचसे पशुपालक घरच्या घरी पशुखाद्य तयार करतात. जनावरांना सतत गव्हाणी (manger) भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावरांच्या वजनाप्रमाणे खाद्य आणि चाऱ्याचे (fodder) नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते. जास्त चारा किंवा पशुखाद्य दिल्याने जास्त दूध (milk) निघेल ही अगदी चुकीची धारणा आहे. याउलट खाल्लेल्या चाऱ्यात जितकी जास्त लाळ (saliva) मिसळून रवंथ केलं जाईल तिथके अधिक दूध उत्पादन मिळेल. जनावरांना खाद्य देताना ते त्यांच्या वजनानुसार कसे द्यावे-

  {जनावराच्या छातीचा घेर (इंच)}   x  लांबी (इंच) =  जनावराचे वजन (कि.ग्रॅ.)

                                   ६६०

-    जनावरांच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायांच्या मागून वरपर्यंत मोजलेला घेर. -    जनावरांची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटापर्यंतचं अंतर. -    जनावरांना त्यांच्या वजनाच्या एकूण ३ टक्के एवढे शुष्क पदार्थ आहारातून मिळाला पाहिजे. -    उदाहरणार्थ. ४०० किलोच्या जनावरास ३ टक्के शुष्क पदार्थ (dry matter) देण्यासाठी पशुखाद्य साधारणपणे ५.५ किलो, कोरडा चारा ४ किलो तर १८ किलो ओला चारा द्यावा, कारण ओल्या चाऱ्यात जवळपास ९० % निव्वळ पाणी असते. पशुखाद्य ,कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आर्द्रतेसह गृहीत धरलंय. -    याव्यतिरिक्त जनावरांना खनिज मिश्रणे (mineral mixture)द्यावीत. हे प्रमाण एका दिवसाचे म्हणजे २४ तासांचे असून दोन वेळेस विभागून जनावरांना द्यावे. -    वाळलेला चारा हिरव्या चाऱ्या पेक्षा (green fodder) कमी पौष्टिक असतो. परंतु यामुळे जनावरांना पोट भरल्याचा समाधान मिळत. -    सुका चारा खाल्याने दुभत्या जनावरांच्या कोठीपोटातील ॲसिटिक आम्लाचे प्रमाण वाढत. ॲसिटिक आम्ल दुधातील फॅट (fat) तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असल्याने, कोरड्या चाऱ्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com