महाराष्ट्रातील दुधाची राणी कोण?

विविध रंगाच्या, आकारच्या शेळ्या महाराष्ट्राच्या विविध भागात आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, संगमनेरी, बेरारी आणि कोंकणकन्याळ या प्रमुख चार जाती आढळून येतात.
Goat Breeds of Maharashtra
Goat Breeds of Maharashtra

जगभरात शेळ्या-मेंढ्यांच्या अनेक जाती आढळून येतात. या विविध जाती हजारो वर्षे त्याच वातावरणात राहिल्याने, त्यांचे ठिकाणी त्यांचा जन्म झाल्याने स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार झालेली दिसून येते.

महाराष्ट्रात वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. कोकणात उष्ण दमट वातावरण, प्रजन्यमान जास्त असते. तर विदर्भ-मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आणि वातावरण उष्ण आणि कोरडे असते. मांस, दूध, लेंडी खत, चामडीसाठी आपल्याकडे शेळ्यांचे पालन केलं जाते.

शेळ्या विविध हवामानाच्या प्रकारात तग धरून राहू शकतात. म्हणजेच अतिउष्ण प्रदेशापासून अतिपावसाच्या प्रदेशातही शेळीपालन करता येऊ शकते. शेळ्यांच्या खाद्याचा विचार केल्यास अत्यंत कमी खर्चात जास्त उत्पादन देऊ शकते.

उस्मानाबादी –

  • हिला महाराष्ट्रातील काळ सोनं असं म्हंटल जातं.
  • पश्चिम महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागात तसेच मराठवाड्यासाठी उत्तम अशी हि जात.
  • हि जगातली मटणासाठीची दोन नंबरची शेळी आहे.
  • हि शेळी रंगाने पूर्णपणे काळी असून कानावर पांढरे ठिपके आणि पोटाच्या खालच्या भागात तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात.
  • जुळी करडे देण्याचे प्रमाण या जातीमध्ये ६० ते ६५ % इतके आहे.
  • संगमनेरी

  • नगर, नाशिक-पुणे या भागासाठी संगमनेरी शेळीचा वापर केला जातो.
  • संगमनेरीला महाराष्ट्रातील दुधाची राणी असे संबोधले जाते.
  • ही शेळी पांढऱ्या, तांबड्या-पांढऱ्या रंगाची असते.
  • मटण आणि दुधासाठी हिचा वापर केला जातो.
  • या शेळीमध्ये जुळी करडे देण्याचं प्रमाण ४०-५०% आहे.
  • बेरारी

  • ही शेळी उष्ण प्रदेशात चांगला तग धरून राहत असल्यानं तिला अग्निशिखा असं म्हंटल जातं.
  • विदर्भातील ही शेळी प्रामुख्याने मटणासाठी वापरली जाते.
  • कोकण कन्याळ

  • ही शेळी मुळातच कोकणातली पंरतु ती नावारूपास आलेली नव्हती. मात्र कोंकण कृषी विद्यापीठांच्या मदतीने नोंदणी झालेली.
  • समुद्राच्या जवळ असल्याने हिला सागरकन्या असं संबोधले जाते.
  • अति पावसाच्या प्रदेशात, समुद्रालगत, दलदलीच्या भागात तग धरून राहणारी आहे.
  • डोंगराळ भागात स्वतःच पालन-पोषण करून राहणारी अशी हि शेळी आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com