कशी रोखाल घटसर्पाची बाधा?

पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची बाधा होऊन, त्यांचा मृत्यु होण्याची संभावना वाढते. पावसाळ्याआधी जनावरांचे घटसर्पविरुद्ध लसीकरण करणे गरजेचं आहे.
Haemorrhagic Septicaemia
Haemorrhagic Septicaemia Agrowon

पावसाळा (Rainy season) सुरु झाला की, वातावरणातील बदलामुळे अनेक सुक्ष्मजीवाणुची वाढ दिसून येते. या काळात जनावरांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झालेली असते. जनावरे विविध आजारांना बळी पडण्याचे प्रमाणही वाढीस लागते. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजारापैकी एक आजार म्हणजे घटसर्प (Haemorghic Septicemia).

पावसाळ्यात (Rainy season) जनावरे आजारी पडून मरतुक होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. जनावरांना रोगाची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय फायद्याचे ठरतात. घटसर्प हा एक जीवाणूजन्य सांसर्गिक रोग असून, त्याला गळासूज असेही म्हटले जाते. यात गळ्याला सूज येऊन, जीभही सुजलेली दिसून येते. जनावरांची जीभ कोरडी पडून बाहेर येते. परिणामी जनावर तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करते. जनावरांच्या बाजूला उभे राहून लक्ष देऊन ऐकल्यास, बाधित जनावरांच्या घशातून, घरघर असा आवाज येतो. या रोगाचा प्रादुर्भाव म्हशीमध्ये जास्त दिसून येतो. लहान वयाची वासरे, या आजाराला लवकर बळी पडतात. आजारी जनावरांच्या सहवासामुळे किंवा दूषित चारा, पाणी याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

Haemorrhagic Septicaemia
जनावरांतील जिवाणूजन्य आजार

घटसर्प झालेल्या जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. शरीराचे तापमान १०६ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत जाते. या आजारात जनावरे जीभ बाहेर टाकत असल्याने तोंडातून सतत लाळ गळत राहते. गळ्याला सूज आल्याने जनावरांना खाताना तसेच गिळतानाही त्रास होतो.
वेळेत उपचार न केल्यास बाधित जनावरे १४ ते ४८ तासात दगावतात.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑईल अॅडज्युव्हंट एच. एस. (Oil Adjuvant H. S.) तेलयुक्त लस टोचून घ्यावी. लसीकरणापूर्वी कृमिनाशक औषधे व परजीवी कीटकांचे निर्मूलन केलेले असल्यास लसीचा चांगला परिणाम दिसून येतो.

Haemorrhagic Septicaemia
कालवडींचे आजार अन् प्रतिबंधात्मक उपाय

आपल्या जनावराला घटसर्प रोगाची बाधा होऊ नये, म्हणून पावसाळ्याआधीच जनावरांचे घटसर्प रोग प्रतिबंधात्मक लसीकरण केले पाहिजे. गोठ्याची नियमित स्वच्छता या रोगाच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते. तुम्ही तुमच्या जनावराचं घटसर्प विरुद्ध लसीकरण केलेलं नसल्यास, त्वरित पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com