अर्धचंद्र आकाराची शिंगे असलेली गाय

गीर ही भारतीय वंशाची गुजरात राज्यात उगम असलेली गाय (Cow)आहे. गिरच आयुष्यमान १२ ते १५ वर्षे इतकं असत. त्यांच्या एकूण आयुष्यात त्या सरासरी ६ ते १० वेत देऊ शकतात.
Gir Cow
Gir Cow

हाफ मून म्हणजे अर्धचंद्र आकाराची शिंगे असलेली गाय, भक्कम बांध्याची, गडद लाल, चॉकलेटी तपकिरी-लाल, पांढरे ठिपके असलेली जिचे कान खाली लांब लोंबकळणारे, पातळ असे, कपाळ बाहेरील बाजूस असल्यानं कडक उन्हापासून संरक्षण होऊन बऱ्याच रोगाविरुद्ध चांगली रोगप्रतिकारशक्ती तिच्यात असते. वशिंड मोठे, भक्कम आणि आकर्षक असं असत. ही सर्व शारीरिक वैशिष्ट्ये गीर गायीची आहेत.  गीर गाय ही भारतातील दुभत्या जनावरांपैकी एक जात आहे. गीर गायीचा उगम गुजरात राज्यातील गीर जंगलाच्या परिसरातील आहे, म्हणून तिला आपण गीर असं संबोधतो. भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी शेती व पशुपालनासाठी गाय, म्हैस यांसारखी दुभती जनावरे पाळतात. पशुपालन सुरु करताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणत्या जातीची निवड करावी जिच्यापासून अधिकाधिक दुधाचे उत्पन्न मिळेल. यासाठी पशुपालकांना गायी किंवा म्हशींच्या दुधाळ जनावरांच्या उत्तम जातीविषयी माहिती असणे गरजेचं आहे.

हेही पाहा- शेणखतासह तूपनिर्मितीसाठी गीर गाय संगोपन गीर ही भारतीय वंशाची गुजरात राज्यात उगम असलेली गाय (Cow) आहे. गिरच आयुष्यमान १२ ते १५ वर्षे इतकं असत. त्यांच्या एकूण आयुष्यात त्या सरासरी ६ ते १० वेत देऊ शकतात. पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठेवण्यासाठी गायीचे जास्तीत जास्त उत्पादनक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात असले पाहिजे. गीर चांगल्या दुधाच्या उत्पादनाबरोबरच दुधातील चांगल्या चरबीसाठी म्हणजे फॅटसाठीही ओळखली जाते.  उगम गुजरातमधला असला तरी गुजरातसोबत महाराष्ट्र (Maharashtra) आणि राजस्थान (Rajsthan) मध्येही गिरचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जात. गीर आकाराने मोठी असते. गीर गायीचं वजन ३८५ किलो तर बैलाचे वजन ५४५ किलो इतके असत. गिरची ओळख चांगली रोगप्रतिकारशक्ती अशी आहे.   उत्तम व्यवस्थापन असल्यास गीर गायीपासून सरासरी १२ ते १४ लिटर दुधाचे उत्पन्न मिळू शकते. दुधात स्निग्धांशांचे प्रमाण हे ४.५ टक्क्यापर्यंत असते. एका वेतात गीर १५९० किलोपर्यंत दुधाचे उत्पन्न देते. गिर (Gir) गाय विविध प्रकारच्या हवामानात तग धरून राहू शकते. विविध रोगाविरुद्ध चांगली रोगप्रतिकारशक्ती असल्यानं सोबतच कोणत्याही वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असल्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे फुले त्रिवेणी या गायीच्या प्रजातीसाठी गीर गायीचा वापर केलाय. नेहमी लक्षात ठेवा चांगली गाय ही आपल्या गोठ्यातच तयार होत असते. आजची कालवड ही उद्याची गाय असते आणि हीच गाय आपल्याला चांगल्या दुधाचे उत्पादन देऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com