जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?

दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची उत्पादकता म्हणजेच दुधाळ जनावरांची ,गायी-म्हशींची दूध उत्पादनक्षमता आणि मांसाचे उत्पादन देणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांचे मांस उत्पादन वाढले पाहिजे.
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?
Hereditary Improvement in Animal

दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची उत्पादकता म्हणजेच दुधाळ जनावरांची ,गायी-म्हशींची दूध उत्पादनक्षमता आणि मांसाचे उत्पादन देणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांचे मांस उत्पादन वाढले पाहिजे. पशुधनाची उत्पादकता आपण दोन प्रकारे वाढवू शकतो. पहिले म्हणजे आपल्याकडे सध्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांचे योग्य, उत्तम आहार व्यवस्थापन करून. पण यात एक गोम अशी आहे की, आपण कितीही उत्तम, चांगल्या प्रतीचे आहार व्यवस्थापन केलं तरी जनावरांच्या अनुवंशिक क्षमतेपेक्षा अधिक दुधाचे उत्पादन वाढू शकत नाही. दुसरा पर्याय म्हणजे उच्च अनुवंशिक गुणधर्म असलेल्या जनावरांचा म्हणजे गायी-म्ह्शीमध्ये अधिक दूध उत्पादन देणाऱ्या, शेळ्या-मेंढ्यामध्ये अधिक मांस उत्पादन देणाऱ्या पशुधनाचा वापर करून येणाऱ्या पिढीतील जनावरांची अनुवंशिक क्षमता सुधारणे होय. उच्च अनुवंशिक गुणधर्म असलेल्या गाय व वळूची निवड करणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.  यासाठी शेतकरी, विर्याचा पुरवठा करणारे, पशुवैद्यकीय अधिकारी, वीर्य उत्पादन केंद्र  आणि संशोधन संस्था या सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. गायी-म्हशींचे पालनपोषण स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध स्त्रोतानुसार विविध प्रकारे केले जाते जे कधीकधी त्यांच्या वातावरणात अनुकूल नसते. जेथे कृत्रिम रेतन पोहोचलेलं नाही किंवा ज्या ठिकाणी जनावरांना चरायला सोडलं जातं अशा वेळी गायीची किंवा म्हशीची गर्भधारणा अपात्र बैलांद्वारे होत असते. यांसारख्या कारणांमुळे वंशावळ सुधारण्याच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण होतो.

कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर करून एका पिढीपासून पुढील पिढीपर्यंत अनुवंशिक योगदान वाढविले जाऊ शकते. भविष्यात चांगल्या उत्पादनासाठी, उत्तम रेकॉर्ड असलेल्या गायी / म्हशींची निवड करावी. अंतर्गत प्रजनन रोखले पाहिजे. अशाप्रकारे तयार केलेल्या जनावरांची अनुवंशिक क्षमता चांगली असेल आणि ती पुढील पिढीत हस्तांतरित होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.