विदेशातील शेळी दिवसाकाठी किती देते दूध ?

शेळी एक अत्यंत गरीब व व्यवस्थापनास सोपा असा प्राणी आहे. शेळीला जागा कमी लागते. इतर जनावरांच्या तुलनेत म्हणजे गायी- म्हशीच्या तुलनेत शेळीला खाद्य कमी लागते. तसेच टाकाऊ अन्न, भाजीपाला, झाडाचा पाला खाऊनही ती जगू शकते.
Highest Milk Producing Goat Breeds in the World
Highest Milk Producing Goat Breeds in the World

शेळी एक अत्यंत गरीब व व्यवस्थापनास सोपा असा प्राणी आहे. शेळीला (goat) जागा कमी लागते. इतर जनावरांच्या तुलनेत म्हणजे गायी- म्हशीच्या (cow-buffalo) तुलनेत शेळीला खाद्य कमी लागते. तसेच टाकाऊ अन्न, भाजीपाला,  झाडाचा पाला खाऊनही ती जगू शकते. चांगला व सकस चारा, खाद्य दिल्यास शेळी दीड ते दोन वर्षांत तीन वेळा विते. शेळी जितकी जास्त पिल्लांना जन्म देईल, तितके उत्पन्न वाढते. बोकड (buck) तीन-चार महिन्यांत विक्रीसाठी तयार होतात. तर मादी आठव्या-नवव्या महिन्यात वयात येते. हेही पाहा- शेळी पालनाच्या विविध पद्धती कोणत्या?

शेळीच्या कातडीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. काही शेळ्यांच्या केसापासून लोकरीचे कपडे व शाली तयार करता येतात. शेळी इतर प्राण्यांच्या मानाने फार काटक असते. ती सर्व प्रकारच्या हवामानात चांगला टिकाव धरून राहते. शेळ्यांना होणारे रोगाचे प्रमाण देखील कमी आहे. म्हणून स्वयंरोजगाराचे उत्तम साधन म्हणून शेळी फार उपयुक्त प्राणी आहे. हेही वाचा-ही शेळी दिसते हरणासारखी अल्पाईन (Alpain goat) ही एक विदेशी शेळी (Exotic goat) आहे. या जातीच्या शेळ्याचे मूळ स्थान फ्रान्स (France), स्वित्झर्लंड (Switzerland) देशांत आहे. या शेळ्या दिवसाला भरपूर दूध देतात. त्यांच्या दुधातील स्निग्धांश ३ ते ४ टक्क्यापर्यंत असते. या जातीच्या शेळीचे एका दिवसाचे दूध उत्पादन ५ लिटरपर्यंत जाते. हेही वाचा- महाराष्ट्रातील दुधाची राणी कोण? अल्पाईन जातींच्या शेळ्यांमध्ये ठराविक रंग आढळत नाही. काळा, पांढरा, करडा किंवा त्यांचे मिश्रण रंगामध्ये आढळते. या जातीच्या शेळ्यांना शिंगे असतात. बोकडाचे सर्वसाधारण वजन ६५ ते ८० तर शेळीचे वजन ५० ते ६० किलो असते.. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य उद्योग, मेंढीपालन, रेशीम उद्योग, मधमाशापालन व वराहपालन असे अनेक व्यवसाय करता येण्यासारखे आहेत. या व्यतिरिक्त शेळीपालन हा व्यवसाय शेतीला पूरक किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून केला जाऊ शकतो. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com