रोगप्रतिकारक क्षमतेच्या अभावी होतात खुरांचे आजार

जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता खुरांच्या आजारास काही अंशी जबाबदार असते. परिणामी जनावरांची प्रकृती खालावते. अचानकपणे आलेल्या लंगडेपणामुळे बैल शेती कामात उपयोगी ठरत नाहीत
hooves infection occur due to decreased in immunity of animals
hooves infection occur due to decreased in immunity of animals

जनावरांची कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता खुरांच्या आजारास काही अंशी जबाबदार असते. परिणामी जनावरांची प्रकृती खालावते. अचानकपणे आलेल्या लंगडेपणामुळे बैल शेती कामात उपयोगी ठरत नाहीत. जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळून येतात. या आजारांचा विपरीत परिणाम जनावरांच्या दूध  उत्पादनावर (milk production) होत असतो. गोठ्यातील अस्वच्छता, दलदल, खडबडीत पृष्ठभाग आणि सततचा ओलसरपणा गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात.

हेही पाहा-  जनावरांच्या खुरांचे आजार आणि त्यावरील उपचार 

जनावरांची खुरे सतत ओलसर राहिल्यास ओलसर खुरे नरम पडून तुटण्याची शक्यता असते.  खुरांचा दाह होऊन लाळ्या खुरकुतसारख्या (Foot and mouth disease) रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  जनावरांची खुरे वर्षातून किमान एकदा योग्य प्रकारे तपासून घेतली पाहिजेत. पावसाळ्यापूर्वी आणि पुढे दर सहा महिन्याच्या अंतराने लाळ्या खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण (vaccination) केले पाहिजे. गोठा मुक्त संचार पद्धतीचा असेल तर पावसाळ्यात या गोठ्यात जास्त दलदल होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. जनावरांच्या आहारात चारा व पशुखाद्याबरोबर खनिज मिश्रणेही द्यावीत. बंदिस्त गोठा असल्यास जनावरांना स्वच्छ व कोरड्या जागी बांधावे. गोठ्यातील फरशी जास्त गुळगुळीत किंवा खडबडीतही नसावी. जनावरांच्या खुरांना जखम झाल्यास ते शेतीकामासाठी उपयोगाचे राहत नाहीत.

जनावरांच्या खुरांना इजा होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना -  -   जनावरांचे खूर कोरडे आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. -   गोठ्यातील मल-मूत्र वेळच्या वेळी साफ केले पाहिजे. -   गोठ्यात पाणी साचू देऊ नये. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. -  गोठ्यामध्ये जाड थराचे बेडिंग तयार करून घ्यावे जेणेकरून जनावरांच्या पायाचा डायरेक्ट संबंध शेण-मूत्राशी येणार नाही व भुश्‍शाच्या थरामुळे खुरांची साफसफाई आपोआपच होऊन जाते. -   गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच खुरांचे आणि गोठ्याचे निर्जंतुकीकरण नियमित केल्यास खुरांचे आजार कमी होतात. जसे आपण कासेचा दाह टाळण्यासाठी टीट डिपिंग करतो, त्याचप्रमाणे फूट बाथिंग करणे खुरांचे आजार टाळण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी शुद्ध पाणी किंवा साबणाचे पाणी, तसेच जंतुनाशकाच्या पाण्याची फवारणी गोठ्यात करावी. -   खुरांच्या आरोग्यामध्ये वेळच्या वेळी खुरे कापून घेणे हा महत्त्वाचा भाग आहे. खुरांच्या झालेल्या कमी- जास्त वाढीमुळे जनावरास सर्व पायांवर संतुलित भार पेलणे कठीण जाते,  त्यामुळे खुरांच्या आजारास जनावर लवकर बळी पडते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com