
अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः २८० ते ३१० अंडी देत असतात. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. गावाकडे अंडी देणाऱ्या कोंबडीला खुडूकावरची कोंबडी असं म्हंटल जातं. संगोपनातील कमतरता, हाताळणी, इतर बाबीमुळे येणारा ताण, जंत प्रादुर्भाव, आजाराची बाधा यामुळे कोंबड्यांची उत्पादनक्षमता कमी होते. डीप लिटर (deep liter) म्हणजेच गादी पद्धतीमध्ये कोंबडी १८ ते २० आठवड्यांची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात करते. ३० ते ३१ आठवड्याची असतना कोंबडी सर्वाधिक अंडी देते कोंबडीची अंडी (eggs) देण्याची क्षमता ७२ आठवड्यापर्यंत टिकून राहते.
हेही पाहा-
कोंबडी अंडी द्यायला तयार आहे हे कसं ओळखावं ?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.