सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल?

पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे जनावरांना कासदाह आजाराची बाधा होते. हा आजार झाल्यानंतर अत्यंत खर्चिक उपाय करण्यापेक्षा दर १५ दिवसांनी कॅलिफोर्निया मॅस्टाटीस चाचणी करावी.
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल?
Identification of sub-clinical mastitis

दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह. या आजारात दुधाळ जनावरांच्या सडातून लाल रंगाचे दूध येते. जनावरांची कास दगडासारखी टणक होते म्हणून तिला आपण दगडी कास असेही म्हणतो. जनावरांमध्ये होणारा हा आजार मानवनिर्मित आहे. पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे जनावरांना या आजाराची बाधा होत असते.

कासदाह आजार झाल्यानंतर अत्यंत खर्चिक उपाय करण्यापेक्षा दर १५ दिवसांनी California mastitis Test करणे हा उत्तम पर्याय आहे.  कॅलिफोर्निया मॅस्टाटीस चाचणी (California mastitis Test) याला आपण थोडक्यात  CMT असंही म्हणतो. पण CMT का? तर आपल्या गोठ्यातील किती जनावरांना clinical mastitis म्हणजे सुप्त अवस्थेतील कासदाह आहे याचं निदान होऊन उपचार करणे सोपे जाते.

हेही पाहा- 

CMT कीट चा वापर कसा करावा?

CMT कीटमध्ये  चार कप्पे असलेलं एक पेडल असत. या चारही कप्प्यामध्ये चारही सडाच्या काही धारा स्वतंत्र काढून घ्याव्यात. या चारही कप्प्यात CMT द्रावण टाकून ते एकत्र होण्यासाठी एका बाजूने हाताने गोलाकार फिरवल जाते. सुप्त अवस्थेतील कासदाह असेल तर दुधात गाठी तयार होतात, दूध जेलीप्रमाने चिकट आणि घट्ट बनते. ही चाचणी अत्यंत सोपी असून पशुपालक घरच्या घरी सुप्त अवस्थेतील कासदाहाचे निदान करू शकतात.

हेही पाहा- 

लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे या आजारात जनावरांचा मृत्यु होत नाही...पण सड निकामी होतात, कासेतील दुग्ध पेशी नष्ट झाल्याने दूध उत्पादनात लक्षणीय घट होते. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. शाश्वत दुधाचे उत्पन्न हवं असेल तर आपल्या गोठ्यातील गायी-म्हशींची सुप्त कासदाह चाचणी वेळोवेळी करत जा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com