कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची

गायी म्हशी माजावर आल्यावर त्यांच योग्य वेळी कृत्रिम रेतन केल्याने गर्भधारणेचे प्रमाण वाढते यासाठी जनावरांमध्ये कृत्रिम रेतनाची योग्य वेळ याबद्दल आज आपण माहिती घेऊया.
कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची
Importance of proper time for artificial insemination in animal

जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी माजावर आलेले जनावर, वापरली जाणारी रेतमात्रा, रेतन करणारा पशुवैदकीय अधिकारी आणि पशुपालक हे चार घटक फार महत्वाचे असतात.

कृत्रिम रेतन म्हणजे काय?

कृत्रिम रेतनात (artificial insemination) एका सिद्ध वळूची विर्यमात्रा म्हणजेच सीमेन शास्त्रीय पद्ध्तीने संकलित करून वीर्याची शीत तापमानाला साठवणूक करून माजावर आलेल्या गायी-म्हशींच्या गर्भाशयात नळीद्वारे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सोडणे, म्हणजे कृत्रिम रेतन होय.

हेही पाहा- 

कृत्रिम रेतनाचे फायदे काय आहेत?

 • नैसर्गिक रेतनातून एका वेळी एकच गाय किंवा म्हैस गाभण राहू शकते.
 • याउलट जातिवंत वळूपासून एकदा वीर्यचं संकलन केल्यानंतर त्यापासून शेकडो रेतमात्रा तयार केल्या जातात.
 • वळू संगोपनाचा अतिरिक्त खर्च टाळता येतो.
 • माजावर आलेल्या गायी-म्हशींना वळूच्या शोधात दूरवर न्यावे लागत नाही.
 • गायी-म्हशींना जनेनिन्द्रीयांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
 • हेही पाहा- 

  कृत्रिम रेतनाची गरज -

  आपला भारत देश दूध उत्पादनात अग्रेसर असला तरी प्रती जनावर दूध उत्पादन क्षमता मात्र कमी आहे. ही परीस्थिती बदलायची असल्यास उच्च वंशावळीची पैदास निर्माण करणे हा शाश्वत पर्याय आपल्याकडे आहे. यासाठी कृत्रिम रेतन हे कमीत कमी वेळेत दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी वरदान आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास महामंडळामार्फत पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी गोठीत विर्यशाळा स्थापित केलेल्या आहेत.

  हेही पाहा- 

  जनावरांमध्ये कृत्रिम रेतन नेमकं केव्हा केलं पाहिजे?

  गायी-म्हशी बरोबर २१ दिवसांनी माजावर (heat) येत असतात. व्यायलेली जनावरे ४५ ते ६० दिवसांनी माजावर येत असतात. गायीचा माज १८ ते २४ तास (hour) असतो, तर म्हशींचा माज २४ ते ३० तासापर्यंत टिकतो. माजाचा मध्य ते उत्तरार्ध या स्पष्ट माजाच्या कालावधीत जनावरांचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. साधारणपणे सकाळी माजावर आलेल्या गायी-म्हशींमध्ये सायंकाळी तर रात्री माजावर आलेल्या गायी-म्हशींमध्ये पहाटे कृत्रिम रेतन करून घ्यावे.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.