भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात लक्षणीय वाढीचे संकेत

सध्या प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य उत्पादनांची युरोपिय युनियन ही सर्वात मोठी बाजारपेठ असून त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. पुढील दशकात हा ट्रेंड कायम राहू शकतो, असेही या अहवालात नमूद केले आहे.
भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात लक्षणीय वाढीचे संकेत
Dairy Export

भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत पुढील दशकात लक्षणीय वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डेअरी उत्पादनांसाठी (Dairy Product) मोठ्या प्रमाणात संधी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी भारताला संधी आहे. वझीर अॅडव्हायजर (Wazir Advisor) या स्वायत्त संस्थेने याबाबतचा अहवाल दिला आहे.

हेही वाचा - कर्जबाजारी कारखान्यांची आर्थिक घडी बसणार ? अमेरिका, कॅनडा आणि न्यूजीलंड सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बाजारात डेअरी उत्पादनांमध्ये स्थिरता दिसत आहे. तर खप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीला संधी आहे, असे डिसेंबर २०२१ च्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय जपान, रशियन फेडरेशन (Russian Federation), मेक्सिको, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका हे प्रमुख निव्वळ आयातदार राहतील. २०२१-३० च्या OECD-FAO च्या कृषी अंदाजानुसार, २०३० मध्ये भारतासह पाकिस्तान जागतिक उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिकचे योगदान देईल.  

जगातील सर्वाधिक मोठा दूध उत्पादक (Milk Producer) असलेल्या भारताने २०१९-२० मध्ये आतापर्यंत सर्वाधिक १९८.४ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन केले असून दरडोई दुधाची उपलब्धता दररोज ४०७ ग्रॅमपर्यंत वाढली आहे. एकूणच भारत पुढील दहा वर्षांमध्ये उत्पादन आणि बाजारपेठेत वाढ होण्याच्या अंदाजासह एका महत्त्वाच्या स्थितीत आहे. हे मूल्य साखळीतील (Value Chain) सर्व सहभागींसाठी चांगले आहे. विशेषत: मूल्यवर्धित उत्पादनांमधून मोठी वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

व्हिडीओ पाहा - 

पुढील दशकात दुग्धजन्य पदार्थांचा जागतिक दरडोई वापर दरवर्षी एक टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. सध्या प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य उत्पादनांची युरोपिय युनियन ही सर्वात मोठी बाजारपेठ (Market) असून त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. पुढील दशकात हा ट्रेंड कायम राहू शकतो, असेही या अहवालात नमूद केले आहे. वझीर अॅडव्हायझर्सच्या अहवालानुसार, मूल्यवर्धित विभागातील मूल्याच्या दृष्टीने सर्वात मोठा वाटा आइस्क्रीमचा आहे. त्यानंतर दही, बेबी फूड आणि चीज यांचा क्रमांक लागतो. भारतासाठी,ताज्या आणि प्रक्रिया केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या घरगुती वापरावर वर्चस्व राहील. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची (International Trade) संधी मर्यादित होईल. परंतु, आंतरराष्ट्रीय व्यापारातील भारताच्या वाटा वाढीचा दर उत्पादकता आणि कार्यक्षमतेशी संबंधित आव्हाने भारत किती लवकर हाताळू शकतो यावर अवलंबून असेल, असेही यात नमूद केले आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकटानंतर बाजारपेठेत भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या (Dairy Product) वापराची पद्धत बदलली आहे. पॅकेज्ड उत्पादनांना आता अधिक मागणी असून ई-कॉमर्स आणि डिजिटल अॅप्सद्वारे (Digital App) विक्री वाढत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.