देशी गायी, म्हशी संशोधन प्रयोगशाळा उभारणार

उपमुख्यमंत्री पवार : पशुधनाला अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी प्रयत्नशील
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

पुणे : पशुधनाचे संगोपन आणि पालनाकडे शेतकरी (Farmers livestock) तर पाळीव प्राणी पालनाकडे शहरी नागरिकांचा कल वाढत आहे. या पशुधनाला (livestock)अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी शासन सर्वोत्तम सेवा देण्यासाठीचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात सर्वोत्तम सुपरस्पेशालिटी रुग्णालय औंध येथे चांगली सेवा देईल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांनी व्यक्त केला.
बैलगाडा शर्यतीचे (Bullock cart race) आयोजन करण्यास परवानगी दिल्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या आहेत. दुधाचे दर (Milk Rate) वाढल्याने गाईंच्या किमती (Cow Price) वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे. यावर अधिक संशोधनासाठी देशी गायी, म्हशी प्रयोगशाळा उभारण्यात (A laboratory for native cows and buffaloes will be set up for research) येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
आला उन्हाळा, पशुधनाला सांभाळा

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय (District Veterinary General Hospital) आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन शनिवारी (ता. ९) करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, (Minister of State Dattatraya Bharane,) (Commissioner of Animal Husbandry Sachindra Pratap Singh,) अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी या दवाखान्यासाठी पुणे महापालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार यांच्याहस्ते ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘शेळी समूह केंद्र (Goat Community Center) अमरावती जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. मासळी केंद्र देखभालीसाठी रुपये ५० कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पशुसंवर्धन महोत्सवासाठी ४०६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.’’

प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) (Zoonotic disease) वाढते प्रमाण लक्षात घेता, हे आजार टाळणे व त्यांचे वेळीच निदान व उपचार करण्याबरोबरच पशुपालकांना (pastoralists) आवश्यक सविस्तर मार्गदर्शन करणे ही आज काळाची गरज असून ती जबाबदारी या संस्थेद्वारे पार पाडण्यात येणार आहे. राज्यातील एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने याचा फायदा राज्यासह जिल्ह्यातील पशुधनाला आणि पयार्याने पशुपालक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे श्री. पवार म्हणाले. येत्या काळात सर्व विभागात आवश्यक पदभरती करण्यास वित्त विभागातर्फे परवानगी देण्यात येणार आहे. विकासकामे करताना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

पशुधनाच्या सर्व सेवा एकाच छताखाली : भरणे
पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, पशुधन विषयक सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पुणे परिसरात जवळपास ४७ खासगी पाळीव प्राणी दवाखाने व ३ सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाने (Super specialty veterinary clinics) उपलब्ध असून या मार्फत पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात. मात्र त्यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या दवाखानाच्या माध्यमातून वाजवी शुल्क आकारून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी
मुळशी तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेऊन मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले भुकूम ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीमध्ये एकोपा टिकवून ठेवण्याचे आवाहन करून श्री. पवार म्हणाले, ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर मंत्रालय म्हणून ओळखले जाते. त्यामाध्यमातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होतो. स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत छोटी असली तरी त्यांची क्षमता मोठी आहे. स्थानिक पातळीवरील विविध विकास कामे करून स्थानिक नागरिकांच्या समस्येचे निराकरण करत त्यांना न्याय देण्याचे काम करता येते. गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com