शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक

शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ हा झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो.
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक
leguminous Fodder Cowpea

शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य हे झाडाचा पाला असतो. शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ हा झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो.

चवळी हे द्विदल वर्गातील चारा पीक आहे. चवळीचा उपयोग चारा म्हणून करताना तो हिरवा किंवा वाळवून देऊ शकतो. चवळीच्या चाऱ्यात १३ ते १५ टक्के प्रथिने आढळून येतात. चवळीची पेरणी करण्यापूर्वी बियाणावर रायझोबियम जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. एक हेक्टर लागवडीसाठी साधारणतः ४० किलो बियाण्याची गरज लागते. चवळी पिकाची खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही लागवड करता येते.

चारा पिकासाठी चवळीची पेरणी एप्रिलपर्यंत करता येत. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर इतके ठेवावे. पेरणी केल्यानंतर पहिल्यांदा १५ ते २० दिवसांनी पहिली खुरपणी करावी. पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास ताबडतोड कीटकनाशकांची फवारणी करावी. चवळी पिकाचा कालावधी साधारणतः ६५ ते ७० दिवसांचा असतो. प्रति हेक्टरी ३० ते ३५ टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.