Maral Fish Conservation : तलावामध्ये मरळ माशाचे संवर्धन

तळ्यामध्ये संवर्धनासाठी स्ट्रिप्ड मरळ प्रजाती ही प्रमाणित केलेली आहे. मरळ हा गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. कमी विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीतही हा मासा टिकून राहू शकते. माशाला गडद तपकिरी रंग व शरीरावर हलके काळ्या पट्ट्यावरून ओळखले जाते.
Maral Fish Conservation
Maral Fish ConservationAgrowon

किरण वाघमारे

मरळ ही गोड्या पाण्यातील माशांची (Maral Fish) सर्वांत किफायतशीर प्रजाती आहे. त्यांना स्नेक हेड (सापासारखे डोके असणारा) (Snakehead Fish) मासादेखील म्हणतात. मरळ मासा (Maral Fish Conservation) ही स्वदेशी प्रजाती आहे. ही प्रजाती हवेतून श्‍वास घेते; मरळ माशामध्ये सुप्राब्रँचियल ॲक्सेसरी हा श्‍वसनाचा अवयव आहे.

कमी विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीतही हा मासा टिकून राहू शकते. माशाला गडद तपकिरी रंग व शरीरावर हलके काळ्या पट्यावरून ओळखले जाते. मरळ माशाला मुरई (हिंदी), मरळ (मराठी), कोरामेनू, कोरामट्टा (तेलुगू), विरल मीन (तमीळ), कोरवा, वट्टन, वराल (मल्याळम), चेंग, शोल (बंगाली), हाल (आसामी) व गदिशा (ओडिशा) या नावाने ओळखले जाते.

Maral Fish Conservation
Fish Farming : डिंभे धरणात मत्स्य व्यवसायासाठी उभारला ‘पेन कल्चर’ प्रकल्प

मरळ हा गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि बिहार आणि ईशान्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमधील ग्राहक इतर कोणत्याही माशांपेक्षा मरळ माशाला प्राधान्य देतात.

हा मासा शिकारी स्वभावाचा आहे. तो पाण्यातील विविध जलचर प्राणी खातो. चांगली मागणी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची क्षमता यामुळे मत्स्यपालनासाठी निवडला जातो.

Maral Fish Conservation
Fish Farming : बायोफ्लॉक : आधुनिक मत्स्यपालनाचे तंत्र

भारतातील मरळ माशाच्या महत्त्वाच्या प्रजाती

पट्टेदार मरळ (चन्ना स्ट्रायटस)

ग्रेट स्नेकहेड मरळ (चन्ना मारुलियस)

स्पॉटेड स्नेकहेड (चन्ना पंक्टॅटस).

संवर्धनासाठी स्ट्रीप्ड मरळ प्रजाती ही प्रमाणित केलेली आहे. मरळ मासळीला भारतात जास्त मागणी आणि उच्च बाजार मूल्य आहे. गोड्या पाण्याच्या भागात मरळ संवर्धनाला चांगली संधी आहे.

माशाची वैशिष्ट्ये

उच्च किंमत मिळवून देणारा मासा. जिवंत स्थितीत विकला जातो.

लहान जागेत, घरामागील अंगण, उथळ किंवा सामुदायिक तलावांमध्ये संवर्धन केले जाऊ शकते.

फिलेट्स, लोणची, करी इत्यादी मूल्यवर्धित उत्पादने बनविण्यासाठी जास्त मागणी.

Maral Fish Conservation
Fish Farming : स्थानिक मत्स्यजाती संवर्धनासाठी ‘वसुंधरा‘संस्थेचा पुढाकार

संवर्धन तलावासाठी आवश्यक बाबी

चांगली गुणवत्ता व मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या ठिकाणी तलाव बांधावा. ०.१ ते ०.२ हेक्टर आकाराचे तलाव हे पट्टेदार मरळ माशाच्या संवर्धनासाठी आदर्श आहेत. पाण्याची खोली १ ते १.५ मीटर असावी.

पाण्याची गळती रोखण्यासाठी तलावाचा तळ आणि डाईकला अस्तर करावे.हेक्टरी १०,००० मरळ मत्स्यबीज सोडू शकतो.

८ ते १० महिन्यांच्या कालावधीत अपेक्षित वाढ ६००-७०० ग्रॅमपर्यंत होते.

पाण्याचे तापमान

मासळीच्या चांगल्या वाढीसाठी आणि खाद्य रूपांतर कार्यक्षमता सुधारण्यासाठी पाण्याचे तापमान नियंत्रित करण्याचा सल्ला दिला जातो. मरळ हा मासा हवेतून श्वास घेणारा असल्याने ते कमी विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीत जगू शकतात.

मत्स्य बीज

साधारणपणे ५ ते ८ सेंमी किंवा त्याहून अधिक आकाराचे मरळ बीज तलावात साठवून ठेवता येतात.

तेलंगणामध्ये बियाणे पुरवठादार/फार्म मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, जे बंदिस्त स्थितीत संगोपनासाठी दर्जेदार मरळ मत्स्यबीज देऊ शकतात.

मत्स्यखाद्य व्यवस्थापन

हा मासा मांसाहारी असल्याने, मत्स्यबीजास चांगल्या प्रतीचे प्रथिनयुक्त पेलेटेड खाद्य देऊ शकतो. सुरुवातीच्या काळात माशांच्या शरीराच्या वजनाच्या ५ टक्के आणि संवर्धनाच्या नंतरच्या काळात २ ते ३ टक्के दराने आहार/खाद्य दिले जाते.

चांगल्या दर्जाचे खाद्य स्थानिक बाजारपेठेत उच्च प्रथिनांसह खाद्य उपलब्ध आहे.

काढणी आणि विक्री

मासे ६०० ते ७०० ग्रॅमपर्यंत पोहोचतात तेव्हा मासे विक्री करावी.

तलावातील मासे गोळा करण्यासाठी मासेमारीच्या जाळ्यांचा वापर करावा.

खुल्या बाजारात सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रति किलो दराने मासळी विकली जाते.

तांत्रिक तपशील

मत्स्यपालनाचे घटक तपशील

मत्स्यबीज संवर्धन प्रजाती पट्टेदार मरळ

(चन्ना स्ट्रायटस)

संवर्धन टाक्या (WSA)

०.२ हेक्टर × ५ १ हेक्टर

सर्वसाधारण खोली १.५ मीटर

मत्स्यबीज आकार बोटूकली (५ ते ८ सेंमी)

संचयन संख्या प्रति टाकी (२०००) १००००

जिवंत राहण्याचे प्रमाण ७० टक्के

अन्न रूपांतर प्रमाण (FCR) १:१.५

संवर्धन कालावधी ८ ते १० महिने

मत्स्यबीज किंमत

(वाहतूक, खर्चासह) १०/ नग

खाद्य किंमत

(४० टक्के क्रूड प्रोटिन) १०० रुपये प्रति किलो

एकूण आवश्यक खाद्य ७.३५ टन

सरासरी वजन (८ ते १० महिन्यात) ७०० ग्रॅम

प्राप्त होणारे मत्स्योत्पादन ४.९० टन

विक्री दर (प्रकल्प स्थळावरून) ४०० रुपये प्रति किलो

- किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com