
आपण आपल्या गोठ्यात जन्माला आलेल्या कालवडीचे संगोपन कसं करतो यावर ती कालवड पुढे जाऊन किती दुधाचे उत्पादन देईल हे ठरत असत. आपल्या गोठ्यातील जनावरांची एकूण संख्या, मजुरांची उपलब्धता, यांत्रिकीकरणाची सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून कालवड संगोपन केले पाहिजे. कालवड संगोपन दोन पद्धतीने केले जाऊ शकते पहिलं तर वासरू गायीजवळ ठेऊन आणि दुसर म्हणजे वासराला गायीपासून वेगळं ठेऊन. या दोन्ही पद्धतीबद्दल आज आपण माहिती घेऊया. हेही पाहा- सुदृढ कालवडीसाठी गाईची सुलभ प्रसूती पहिली पद्धत वासराला गायीबरोबर ठेवून संगोपन करणे-
या पद्धतीत नवीन जन्माला आलेल्या मादी वासराला गायीबरोबर ठेऊनच मादी वासराचे संगोपन केले जाते. यामुळे गायीचे आणि वासराचे दृढ बंध तयार होतात.
मादी वासराला या पद्धतीमुळे नैसर्गिक पद्धतीने दूध प्यायला मिळाल्याने ते सरळ पोटाच्या छोट्या चौथ्या कप्प्यात म्हणजे खऱ्या पोटात जाऊन त्याचं योग्य पद्धतीने पचन होते.
वासराला दूध पिणे शिकवण्याची गरज पडत नाही, त्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही.
जसे या पद्धतीचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत.
या पद्धतीत कालवड किती प्रमाणात दूध पिते यावर आपले नियंत्रण राहत नाही. यामुळे कालवडीचे योग्य पोषण होती कि नाही हे लक्षात येत नाही.
चुकून काही कारणास्तव वासराचा म्रुत्यु झाल्यास गाय दूध देणे बंद करते.
कालवडीने अधिक प्रमाणात दूध पिल्यास संगोपनावरचा खर्च वाढतो याउलट कमी प्रमाणात दूध पिल्यास योग्य वाढ होत नाही.
आता पाहूया वासराला गायीपासून वेगळे करून संगोपन करण्याची पद्धत- या पद्धतीत संगोपन करताना कालवडीला गायीपासून वेगळे करून संगोपन केले जाते.
या पद्धतीत मादी वासराला सुरवातीचे ३ ते ४ दिवस गायीबरोबर ठेवून सुरवातीचा चीक सरळ कासेतून पाजला जातो, नंतर स्वतंत्रपणे संगोपन केले जाते.
या पद्धतीमध्ये वासराला दूध पाजणे शिकवावे लागते. रबराच निप्पल असलेली बाटली किंवा बकेटमधून दूध पिणे शिकवण सोपे जाते.
बकेटमधून दूध पिणे शिकविताना हे भांडे साधारण गायीची कास ज्या उंचीला असते तितक्या उंचीला ठेवले जाते.
मादी वासराच्या तोंडात एक बोट द्याव, बोट चोखायला सुरवात केल्यानंतर हळू हळू ते बोट दुधाच्या भांड्यात बुडवावे, नंतर बोट काढून घेतले की, कालवड दूध प्यायला सुरवात करते.
या पद्धतीत मोजून दूध पाजणे सोयीचे जाते. जर काही कारणास्तव गायीला चीक किंवा दूध नसेल तर दुसऱ्या गायीचा चीक किंवा दूध पाजून संगोपन करता येते.
दुधाऐवजी मिल्क रिप्लेसर वापरून वाढवण या पद्धतीत शक्य होते. कालवड असण्याचा किंवा नसण्याचा गायीच्या दूध उत्पादन क्षमतेवर फरक पडत नाही.
गायी बरोबर वासरू नसल्यास ती लवकर माजावर येऊन गाभण राहते. दोन वेतातील अंतर कमी होऊन वर्षाला एक वासरू मिळणे शक्य होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.