
पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार व्यवस्थापनावर होत असतो. या ६० ते ७० टक्क्याच योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय अधिक किफायतशीर होऊ शकतो. यात चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे.
नेपियरसाठी पूर्वमशागत- लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.
हेही पाहा- नियोजन चारा पिकांचे...
लागवड पध्दती-
हेही पाहा- सकस चाऱ्यासाठी बीएचएन - १० संकरित नेपियर
वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी चारा पिकांचे नियोजन करून तशी उपलब्धता ठेवावी लागते. नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखले जात होत. हे त्याच्यातील उंचपणा व जास्तीत जास्त फुटवे देण्याच्या क्षमतेमुळे ते नावारूपाला आले होते. नेपियर गवत हे बहुवार्षिक असल्यामुळे ते एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत चारा उत्पादन देऊ शकतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.