NADEP Composting: नाडेप कंपोस्ट खत कसे बनवावे?

नाडेप पद्धतीचा वापर करून उत्तम पद्धतीचे कंपोस्ट खत तयार होते. या पद्धतीमध्ये शेण, स्वयंपाक घरातील कचरा व इतर टाकाऊ पदार्थांचा वापर केला जातो.
Nadep method of compost preparation
Nadep method of compost preparation

नाडेप पद्धतीचा वापर करून उत्तम पद्धतीचे कंपोस्ट खत तयार होते. या पद्धतीमध्ये शेण, स्वयंपाक घरातील कचरा व इतर टाकाऊ पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थ ९० ते १२० दिवसांमध्ये कुजून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. नारायण देवराव पांढरीपांडे ( पुसद,जि. यवतमाळ) यांनी ही पध्दत विकसित केली. त्यामुळे या पध्दतीला नाडेप कंपोस्ट (NADEP Composting) असे नाव देण्यात आले. नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत कसे बनवायचे, याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती देली आहे.

Nadep method of compost preparation
कंपोस्ट खत कसे तयार करावे ?

नाडेप कंपोस्ट खत बनविण्यासाठी प्रमाणके

सेंद्रिय पदार्थ - १४०० ते १५०० किलो

शेण व मूत्र - ९५ ते १०० किलो

बारीक माती - १००० किलो

पाणी - १५०० ते २००० लिटर

नाडेप टाकीची रचना कशी असते?

सर्वप्रथम १० फूट लांब, ६ फूट रुंद आणि ३ फूट उंच आकाराची साधी आयताकृती विटांची पक्की टाकी बांधावी. बांधकाम करत असताना खालचा थर हा सिमेंट वाळूमध्ये बांधावा.

टाकी बांधत असताना हवेसाठी अधून मधून मोकळी जागा सोडावी. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. प्रत्येकी दोन विटांच्या थरानंतर तिसऱ्या थरामध्ये प्रत्येकी दोन विटानंतर ६ ते ७ इंचाची मोकळी जागा सोडावी. अशा पद्धतीने विटांचे १० थर बांधून घ्यावेत. ३, ६ आणि ९ व्या थराला हवेसाठी मोकळी जागा सोडावी. अशा पद्धतीने ७४ छिद्रे असलेली टाकी बांधून होते.

बांधकाम झाल्यानंतर टाकीच्या तळाला विटांचा कठीण थर द्यावा. टाकीच्या भिंती आतून माती आणि शेणाने लिंपून घ्याव्यात.

टाकी भरण्याची पद्धत

टाकी भरत असताना सर्वप्रथम टाकीचा आतला भाग शेण आणि पाणी मिश्रणाने ओला करून घ्यावा.

उपलब्ध असलेले सर्व सेंद्रिय पदार्थाचे बारीक तुकडे करून ६ इंच जाडीचा पहिला थर द्यावा.

दुसऱ्या थरामध्ये १५० लिटर पाण्यामध्ये ४ किलो शेण मिसळून शिंपडावे.

तिसऱ्या थरामध्ये, शेण आणि मातीचा (२० ते ६० किलो) एकसारखा थर द्यावा, आणि पाण्याने ओलावा करून घ्यावा.

Nadep method of compost preparation
पिकाला विद्राव्य खते कशी द्याल?

खत निर्मिती कशी होते ?
टाकी भरण्यासाठी साधारण १० ते १५ थर देऊन १ ते १.५ फूट टाकीच्या वर उंची येईल इतकी भरावी. टाकी भरल्यानंतर माती व शेणाने झाकून घ्यावी.
उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी नाडेप कंपोस्ट टाकीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ६० टक्के रहाण्यासाठी ६ ते ७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
एका टाकीतून ३ ते ४ महिन्याने उत्तम प्रतीचे २.५ ते ३ टन कंपोस्ट तयार होते. कुजलेले तपकिरी रंगाचे व कोणताही कुबट वास नसलेले हे कंपोस्ट खत पिकांसाठी वापरावे.
तयार कंपोस्ट खत चाळणीने चाळावे. चाळल्यानंतर राहिलेला भाग परत नाडेप कंपोस्टींगसाठी टाकीमध्ये वापरावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com