जनावरांच्या पैदास कार्यक्रमात या गोष्टी कटाक्षाने टाळा

गायी-म्हशींमध्ये प्रत्येक पिढीत, प्रत्येक वेतातील दूध उत्पादन वाढीसाठी आनुवंशिक सुधारणेद्वारे विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जनावरांच्या पैदास कार्यक्रमात या गोष्टी कटाक्षाने टाळा
artificial insemination in animalAgrowon

गायी-म्हशींमध्ये प्रत्येक पिढीत, प्रत्येक वेतातील दूध उत्पादन वाढीसाठी आनुवंशिक सुधारणेद्वारे विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुधाळ जनावरांची (milch animals) दूध देण्याची क्षमता वाढविण्यासाठी जनावरांमध्ये आनुवंशिक सुधारणा करणे गरजेचं आहे. दूध देण्याची क्षमता पुढील पिढीमध्ये उतरवण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्राचा वापर अनिवार्य आहे. पैदास सुधारणा कार्यक्रम राबविल्यानंतर पुढील पिढीमध्ये कोणत्या गुणधर्माची आवश्यकता आहे, याबाबत अभ्यास करूनच पैदास केली पाहिजे.

आपल्या गोठ्यातील जनावरांमध्ये उत्तम आनुवंशिक सुधारणा (genetic improvment) घडवून आणण्यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

पैदास कार्यक्रमात अनुवंशिक दोष, दीर्घकाळ वंध्यत्व असलेल्या जनावरांचा पैदास कर्यक्रमात वापर करणे कटाक्षाने टाळावे.

आनुवंशिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्याही जनुकीय गुणधर्माची माहिती नसलेल्या वळूचा वापर करून, जनावरांचे रेतन करू नये.

 artificial insemination in animal
गाभण गाय का आटवितात ?

जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी देशी जनावरांचे विदेशी जनावरांबरोबर संकर करू नये. शक्य असल्यास, परजातीय पैदास टाळावी.जनावरांची आंतरजातीय पिढ्यामध्ये सतत पैदास करू नये.

पैदास कार्यक्रमात कोणत्याही वळूचा किंवा रेड्याचा वापर त्याची आरोग्य तपासणी केल्याशिवाय करू नये. नोंदी नसलेल्या, कोणतीही आनुवंशिक माहिती नसलेल्या जनावरांचा रेतन पद्धतीमध्ये समावेश करू नये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com