कोंबड्यांना दिली जाणारी लस कुठे मिळेल?

कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्याचे पालन करत असताना कोंबड्याच्या रोगांचे नियंत्रण करणे फार गरजेचे आहे. कोंबड्यांना रानीखेत आणि कोंबड्यांची देवी या दोन रोगाविरुद्ध लसीकरण करणे गरजेचे आहे.
Poultry Vaccination
Poultry Vaccination

कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्याचे पालन करत असताना कोंबड्याच्या रोगांचे नियंत्रण करणे फार गरजेचे आहे. कोंबड्यांना रानीखेत आणि कोंबड्यांची देवी या दोन रोगाविरुद्ध लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मांसल म्हणजे ब्रॉयलर पक्षांमध्ये गंबोरा रोगाविरुद्ध लसीकरण करावं लागत.

हेही पाहा- परसातील कोंबड्यांच्या विविध जातींची माहिती 

या लसी मागणीनुसार नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध होत असतात. ग्रामीण भागात ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा बहुतेक गावात श्रेणी -१ चे पशुवैद्यकीय दवाखाने काम करीत आहेत. या दवाखान्याकडे लसींची मागणी नोंदवून आणि विहित शुल्क भरून रानीखेत आणि कोंबड्यांची देवी या रोगाविरुद्ध लसी मिळू शकतात. गंबरो प्रतिबंध लस मात्र बाजारातून विकत घ्यावी लागते. या लसी देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकांची, कर्मचाऱ्यांची मदत घेता येते.

पक्षांमध्ये जास्त प्रमाणात मरतुक झाल्यास त्याचे नेमके कारण शोधण्यासठी, मेलेल्या पक्षांचे शवविच्छेदन करून, काही चाचण्या करून रोगाची निश्चिती करून घेण गरजेचं असते. अशा प्रकारे विविध रोगाची निश्चिती करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा उपलब्ध आहे. यापुढे जाऊन रोगाचे अचूक निदान करण्यासाठी औंध, पुणे येथे रोग अन्वेषण विभाग ही संस्था काम करत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com