लाळ्या खुरकूत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

लाळ्या खुरकुत हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा रोग आहे. या रोगामुळे आपल्या देशाचं १२ ते १४ हजार कोटी रुपयांचं नुकसान दरवर्षी होत असते. या रोगामध्ये दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होते. हा एक विषाणूजन्य रोग आहे.
Preventive measures on Foot and mouth disease in animals
Preventive measures on Foot and mouth disease in animals

लाळ्या खुरकुत (foot and mouth) हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा रोग आहे. या रोगामुळे आपल्या देशाचं १२ ते १४ हजार कोटी रुपयांचं नुकसान दरवर्षी होत असते. या रोगामध्ये दिसून येणारे दुष्परिणाम म्हणजे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होते. हा एक विषाणूजन्य (viral) रोग आहे. 

लक्षणे  

  • तोंडातून लाळ (saliva) गळणे.
  • तोंडामध्ये आणि पायांच्या खुरांमध्ये (hooves)व्रण येणे. 
  • तोंडामध्ये व्रण झाल्याने जनावरांचा आहार मंदावतो. 
  • जिभेला चट्टे पडतात. 
  • खुरांमध्ये झालेल्या जखमांवर माशा अंडी घालतात, त्यामुळे जखमा अधिक चिघळतात.
  • जनावरांना चालण्यात अडथळे निर्माण होतात. 
  • जनावर अचानक आजारी पडते.  
  • वजनात व दुग्धोत्पादनात घट होते. 
  • हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार वाढत असतो.
  • हेही पाहा - जाणून घ्या...लाळ्या खुरकुत बद्दल

    प्रतिबंधात्मक उपाय  - प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये लसीकरण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. 

  • आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. 
  • जखमांवर योग्य ते प्रतिजैविक मलम लावावे.
  • तोंडामधील व्रण पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.
  • झालेल्या जखमांना नियमितपणे मलमपट्टी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com