शेळी का अडते?

शेळी विताना काही बदल झाल्यास म्हणजे करडू बाहेर येण्याची स्थिती चुकल्यास शेळी अडण्याची समस्या दिसून येते.
Goat Kidding Problems
Goat Kidding Problems

शेळी विताना काही बदल झाल्यास म्हणजे करडू बाहेर येण्याची स्थिती चुकल्यास शेळी अडण्याची समस्या दिसून येते. सर्वसाधारण परीस्थितीत करडू डोके आणि पुढील दोन पाय किंवा मागील दोन पायांनी बाहेर येत असते. याव्यतिरिक्त कोणती स्थिती उद्भवल्यास शेळी अडण्याची समस्या दिसून येते. या स्थिती कोणत्या आहेत ते पाहूयात. -    करडांचा एक किंवा दोन्ही पाय दुमडलेले असल्यास.   -    करडाचे डोके दुमडलेले असल्यास. -    करडाचा आकार मोठा असल्यास. -    शेळी विताना शेळीच्या गर्भाशयाची स्पंदने कमी असणे म्हणजे प्रसरण पावण्याची   क्षमता कमी असल्यास. -    शेळीचा योनीमार्ग लहान असल्यास. -    शेळीला जुळे होणार असल्यास दोन करडांपैकी एका करडाचे (Kid) डोके आणि   दुसऱ्या  करडाचे पुढील पाय एकाच वेळेस बाहेर येणे.

शेळीमध्ये अशा कोणत्याही प्रकारची स्थिती उद्भवल्यास त्वरित पशुवैद्यकाची मदत घ्यावी. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच योग्य तो उपचार करावा. पहिलारू शेळ्यांमध्ये अडण्याचे प्रमाण जास्त असते. शेळी (Goat) अडण्याचे प्रमाण पहिलारू शेळी आणि इतर शेळ्यांमध्ये अडण्याचे प्रमाण अनुक्रमे १० आणि ५ टक्के इतके असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com