जनावरांमध्ये का होतो कासदाह?

कासेचा दाह हा आजार मानवनिर्मित आजार आहे. पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे हा आजार होत असतो. हा आजार शक्यतो गाय विल्यानंतर १०-१५ दिवसांनी दिसतो, गाय विण्यापूर्वी १०-१५ दिवसात दिसतो.
Reasons for Mastitis in lactating animals
Reasons for Mastitis in lactating animals

कासेचा दाह हा आजार मानवनिर्मित आजार आहे. पशुपालकांच्या व्यवस्थापकीय चुकांमुळे हा आजार होत असतो. हा आजार शक्यतो गाय विल्यानंतर १०-१५ दिवसांनी दिसतो, गाय विण्यापूर्वी १०-१५ दिवसात दिसतो. बरेचदा गाय आटविल्यानंतर निदर्शनास येतो. जीवाणू संक्रमण - गायीचे दूध (milk) काढल्यानंतर सडाचे छिद्र ३० ते ४५ मिनिटे उघडे असतात. अशा कारणाने दूध काढल्यानंतर गायीला बसू देऊ नये. अशा परिस्थितीत गाय खाली बसल्यास, बसण्याची जागा अस्वछ् व ओली असल्यास, त्याठिकाणी असलेले जीवजंतू (microorganism) सडावाटे कासेमध्ये प्रवेश करतात. हे जीवाणू बरेचदा कासेल्या असलेल्या जखमामधून आत प्रवेश करतात. हेही पाहा - कासदाह झाल्याने दुग्धपेशी नष्ट होतात 

कास दाहची कारणे- -    मोठी कास असणाऱ्या जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते. -   मोठी कास असल्यास सडांना व कासेला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. -    संकरित जनावरांमध्ये स्तनदाहाचे प्रमाण जास्त असते. -    वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्ये प्रमाण जास्त असते. -    जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता. -    धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता. -    दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे. -    कासेला जखम झालेली असल्यास. -  जनावरांच्या पशु खाद्यामध्ये विटामिन इ आणि सेलेनिअम(selenium), जस्ताची (zinc) कमतरता असल्यास.   

प्रतिबंधात्मक उपाय – 

  • पशुधन व्यवस्थापन आणि पशुधनाची निवड यांच्याशी सांगड घालणे आवश्यक आहे.
  • धार काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर कास स्वच्छ धुवून कोरडी करणे आवश्यक असते.
  • सध्या बाजारात टीट डीप मिळते, धार काढल्यानंतर त्याचा वापर करावा.
  • गायीला आटविताना सडामधून इंट्राम्यामरी ट्युब पशुवैद्काच्या सल्ल्याने सोडावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com