कसा करायचा रानडुक्करांचा बंदोबस्त ?

रानडुक्कर प्रामुख्याने रात्री किंवा पहाटे सुर्योदयापुर्वी जास्त सक्रिय असतात. रानडुक्करांच्या नियंत्रणासाठी शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण करावे. तसेच सामूहिक पद्धतीने भौतिक, रासायनिक पद्धतींचा वापरदेखील फायदेशीर ठरतो.
कसा करायचा रानडुक्करांचा बंदोबस्त ?

रानडुक्कर (wild pig) प्रामुख्याने रात्री किंवा पहाटे सुर्योदयापुर्वी जास्त सक्रिय असतात. रानडुक्करांच्या नियंत्रणासाठी शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण करावे. तसेच सामुहिक पद्धतीने भौतिक, रासायनिक पद्धतींचा वापरदेखील फायदेशीर ठरतो. रानडुक्कर ऊस (Sugarcane), मका (Maize), ज्वारी, तूर, हरभरा, भुईमूग, सोयाबीन (Soybean) आणि भाजीपाला (vegeetable) पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. रानडुक्करांची डोळ्यांनी बघण्याची क्षमता कमी असली तरी हुंगण्याची क्षमता उत्तम असल्यामुळे ते दूर अंतरावरील पिकांचा शोध घेतात. रानडुक्कर अन्न शोधण्यासाठी डोळ्यांपेक्षा नाकाचा उपयोग जास्त करतात. हुंगून आणलेलं अन्न खोदण्यासाठी ते पुढचे पाय आणि सुळ्यांचा वापर करतात. त्यामुळे शेतात बऱ्याच ठिकाणी जमीन उकरलेली दिसते. हेही पाहा- हैद्राबादी बिर्याणीसाठी हे मटण वापरले जाते !

नियंत्रणाच्या विविध पद्धती (methods) 

  • यात शेताच्या बाजूने नैसर्गिक कुंपण म्हणून काटेवर्गीय वनस्पती जसे की करवंदाची जाळी, निवडुंग यांची लागवड करावी.
  • फोरेट या रसायनांचा वास अतिशय तीव्र असल्यामुळे शेतातील पिकांचा वास रानडुक्करापर्यंत पोहचत नाही. रेतीमध्ये फोरेट २०० ग्रॅम मिसळून सछिद्र पॉलिथिन किंवा कापडी पिशवीमध्ये बांधून घ्यावे. ही पिशवी पिकाच्या कडेला बांबूच्या सहायाने जमिनीपासून १०० सें.मी. उंच आणि ३ मीटर लांबीवर लावावी. यामुळे पिकाचे नुकसान ५० ते ६० टक्क्यांनी कमी होते. या शेताच्या जवळ जनावरांना चरायला सोडू नये.
  • नारळ काथ्याची जाड दोरी केरोसीनमध्ये भिजवून पिकाच्या चारही बाजूला जमिनीपासून एक फूट उंचीवर असे एकूण तीन थर बांधावेत. केरोसीनच्या वासामुळे रानडुक्कर पिकाचे नुकसान करत नाही.
  •  पिकाच्या चारही बाजूने वेगवेगळ्या रंगाच्या साड्या लावाव्यात. यामुळे रानडुक्करांना मानवी उपस्थितीचा आभास होतो आणि अशा भागात येणे टाळतात.
  • इलेक्‍ट्रॉनिक भोंग्याचा वापर- या उपकरणामध्ये स्पिकर ॲम्पीलीफायर आणि सोलार चार्जिंग युनिट असते. हा भोंगा लाकडी स्टॅंडवर लावला जातो. यात रानडुक्करांमध्ये भिती निर्माण करण्याकरिता विविध प्राण्यांचे आवाज विशिष्ट क्रमाने लावलेले असतात. दर तीन दिवसानंतर आवाजामध्ये बदल करण्यात येतो. या भोंग्याची किंमत १० ते १५ हजार रुपये इतकी आहे. हा भोंगा शेतामध्ये लावल्यामुळे जवळपास ४ ते ५ एकर परिसर संरक्षित होतो.
  • शेताभोवती सौरउर्जाचलित कुंपण उभारावे. या कुंपणामध्ये तारेतून १२ व्होल्ट विद्युत वहन होते. त्यामुळे वन्य प्राण्यांना विजेचा झटका बसतो. मात्र जीवित हानी होत नाही. फक्त त्यांच्यामध्ये भिती निर्माण होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com