पिकांचे अवशेष जाळल्याने होणारे दुष्परिणाम

पिकांचे अवशेष जाळल्याने वातावरणात हानिकारक धूर तयार होतो. या धुरामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते.
पिकांचे अवशेष जाळल्याने होणारे दुष्परिणाम
Stubble Burning problemsAgrowon

पिकांचे अवशेष (residue) जाळल्याने वातावरणात हानिकारक धूर तयार होतो. या धुरामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे (carbon dioxide) प्रमाण वाढते. जास्तीच्या कार्बन डाय ऑक्साईडमुळे वातावरणातील तापमान वाढीस चालना मिळते. पिक अवशेषांमध्ये असलेल्या कर्बाचा ऱ्हास होतो. जमिनीवर जाळल्याने जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंचाही नाश होतो. जमिनीच्यावरील थर कडक होऊन, जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो.

आपल्या देशात दरवर्षी खुप मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष उपलब्ध होतात. यापैकी बहुतांशी अवशेष जाळून टाकले जातात. तर उर्वरित अवशेष हे जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरले जाते. पिकांचे अवशेष दीर्घकाळापर्यंत जाळल्यास त्यातील कार्बन व नायट्रोजन निघून जाते. दरवर्षी जवळपास ७० टक्के कार्बन आणि ०.६६ टक्के मिथेन हवेत उडून जात असतो.

Stubble Burning problems
गाय-म्हैस एकाच रेतनात गाभण राहण्यासाठी महत्वाच्या गोष्टी | Artificial Insemination | ॲग्रोवन

याउलट पिकांच्या अवशेषांचा शास्त्रोक्त वापर केल्यास अनेक फायदे होतात. उपलब्ध पिकांच्या अवशेषांचा वापर जमिनीवर आच्छादन देण्यासाठी करू शकतो. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.