कशी करायची नेपियरची लागवड ?

बहुवार्षिक नेपियर गवताची लागवड एकदा केल्यानंतर ते दोन ते तीन वर्षापर्यंत चारा उत्पादन देते.
संकरित नेपिअर गवत
संकरित नेपिअर गवत Agrowon

बहुवार्षिक नेपियर गवताची (multicut nepiyar fodder) लागवड पशुपालकांसाठी नेहमी फायद्याची ठरते. बहुवार्षिक म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर २ ते ३ वर्ष पुन्हा लागवड करावी लागत नाही. ठराविक दिवसाच्या अंतराने कापणी करून तो जनावरांना खाऊ घालता येतो.

नेपियर गवताची लागवड ही पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केली पाहिजे. खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. अति पावसाच्या प्रदेशात नेपियर तग धरून राहू शकतो.

संकरित नेपिअर गवत
का म्हणतात या म्हशीला मराठवाड्याचं काळं सोनं ?

लागवडीसाठी एक खोल नांगरणी करून घ्यावी. कारण नेपियर गवत जवळपास तीन वर्षे त्याचं जमिनीत राहणार आहे. २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या वखरणी वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिक्स करून घ्यावे.

संकरित नेपिअर गवत
जनावरांच्या नाकातून चिकट स्त्राव येत असल्यास ‘या’ आजाराची बाधा

लागवड पद्धत-

- नेपियर गवताची कांडी ४ x २ फूट अंतरावर लावल्यास मुबलक चारा उत्पादन मिळते.
- ४ फुटाची रुंदी ठेवल्यामुळे आंतरमशागत करणे सोप्पे जाते.
- खरीप हंगामासाठी जूनमध्ये नेपियर गवताच्या कांड्याची लागवड करावी.
- तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावाव्यात.
- लागवड करताना प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाशचा डोस द्यावा. पहिल्या कापणीनंतर पिकांची चांगली वाढ होण्यासाठी २५ किलो नायट्रोजन द्यावे.
- गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या कराव्यात.
- उन्हाळ्यात लागवड केल्यास सुरुवातीला दोन आणि नंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- गवताची लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यांनी पहिली कापणी करावी.
- कापणी करत असताना जमिनीपासून १५ ते २० सेंटीमीटर अंतरावर केल्यास चांगले फुटवे फुटतात.
- पुढील कापण्या गवताच्या वाढीनुसार दीड ते दोन महिन्यांनी कराव्या.
- नेपिअर गवताच्या एका वर्षात सर्वसाधारणपणे साथ ते आठ कापण्या मिळतात. हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळते.


नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखले जात होते. हे गवत त्याच्यातील उंचपणा व जास्तीत जास्त फुटवे देण्याच्या क्षमतेमुळे ते नावारूपाला आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com