Lumpy Skin : साखरखेर्डा परिसरात ‘लम्पी स्कीन’चा जोर कायम

सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत गेल्या सप्ताहात ११६ गुरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाली असून, तीन जनावरेसुद्धा दगावली आहेत. ११६ गुरांवर ‘लम्पी स्कीन’चे उपचार सुरू आहेत.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

साखरखेर्डा, जि. बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत गेल्या सप्ताहात ११६ गुरांना ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) ची बाधा झाली असून, तीन जनावरे (Animal) सुद्धा दगावली आहेत. ११६ गुरांवर ‘लम्पी स्कीन’चे उपचार सुरू आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : गडचिरोली जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव

या परिसरातील जनावरांवर लम्पी स्कीनचा आजार दिवसेंदिवस फोफावत चालला असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या १० दिवसांत साखरखेर्डा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ११६ जनावरांना लम्पी स्कीन आजार झाल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी तीन गायींचा मृत्यू झाला आहे.

Lumpy Skin
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लम्पी स्कीन हा आजार फैलावत असून, यावर तातडीने उपचार करून आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. परंतु सार्वजनिक हौदावर पाणी पाजणे, मोकाट सुटलेल्या जनावरांवर पायबंद घालणे हा प्रकार ग्रामपंचायत स्तरावर होत नसल्याने दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजार वाढत चालला आहे.

नागरिकांनी गायी, वासरे मोकाट न सोडता त्यांना एकाच ठिकाणी ठेवावे. तरच लम्पी स्कीन आजार आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुंढे यांनी केले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पीवर लसीकरण प्रभावी ठरतंय का ?| ॲग्रोवन

रिक्त पदांचे ग्रहण लागले असून साखरखेर्डा हा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा आहे. येथे १ पशुवैद्यकीय अधिकारी, २ कम्पाउंडर, १ परिचारक अशी ४ पदे आहेत. मात्र आज रोजी श्रेणी एक दवाखान्यात केवळ एकच परिचारक म्हणून कार्यरत आहे.

नुकतीच १ नोव्हेंबरपासून नांदेड जिल्ह्यातील एका डॉक्टरांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर कम्पाउंडरची दोन्ही पदे चार वर्षांपासून रिक्त आहेत. पशुवैद्यकीय अधिकारीसुद्धा पाच वर्षांपासून स्थायी मिळालेला नाही. आठवड्यातून दोन दिवस ते येतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com