चिकनच्या घाऊक बाजारात पडझड; किरकोळमध्ये तेजी

अनुदानावर पशुखाद्य पुरवठ्याची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी
Poultry
Poultry Agrowon

नागपूर : इंधन दरवाढ, (Fuel price hike) कोंबडीच्या खाद्यान्नात झालेल्या दरवाढीमुळे चिकनच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. ही विक्रमी वाढ असून प्रति किलो २३० ते २४० रुपयांवर दर पोचले आहेत. मटणाचे भाव वाढल्याने (Rising meat prices) मांसाहारी चिकनकडे (chicken) वळले होते. मात्र आता चिकनचे भावही हळूहळू वाढू लागले आहेत. तेजीचा हा फायदा किरकोळ विक्रेत्यांना होत असून पोल्ट्री व्यावसायिकांवर मात्र उत्पादकता खर्चापेक्षा कमी दराने पक्षी विक्री करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री (Poultry) चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या. त्यानंतर काही महिन्यापूर्वी ‘बर्ड फ्लू’ची (bird flu) अफवा पसरल्याने पोल्ट्रीधारकांनी भीतीमुळे त्यावेळी कमी उत्पादन (Production)घेतले. आता सोयाबीन (Soybean) आणि मक्यांच्या (Maize) खाद्यांत विक्रमी वाढ झालेली आहे. तसेच पिलाचे दरही वाढलेले आहे. पूर्वी ७० ते ८० रुपये कोंबडीच्या पालनपोषणासाठी (raising chickens) खर्च होत होता.

Poultry
खाद्याच्या दरवाढीमुळे पोल्ट्री उद्योग मेटाकुटीला

आता तो ११० ते १२० रुपयांवर गेला आहे. त्याच्याच परिणाम भाववाढीवर झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात २३० ते २४० रुपये प्रती किलोने ब्रॉयलर चिकनची ( For raising chickens ) विक्री होत आहे. आता दीड वर्षानंतर चिकनचे दर दुप्पट झाले आहे. दीड वर्षापूर्वी चिकनचे दर १२० ते १४० रुपये किलोपर्यंत असायचे. उत्पादन आणि मागणी यामध्ये जास्त फरक नसल्याने किमती सुद्धा स्थिर राहत होत्या. मात्र, लॉकडाऊनमध्ये (lockdown) अनेक पोल्ट्री चालकांना फटका बसल्याने त्यांना पोल्ट्री बंद कराव्या लागल्या.
पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर दुप्पट (Food prices double) झाले, पक्षाच्या किमती वाढल्याने पोल्ट्री चालक अडचणीत आले आहे. नाइलाजाने त्यांना कोंबडीचे दर (Poultry rates) वाढवावे लागले आहे. गेले आठवड्यापर्यंत पोल्ट्री व्यवसायिकांना १२० ते १४० रुपये असा घाऊक दर मिळत होता. आता मात्र रामनवमी व इतर सण उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी कमी झाल्याने दरही घसरले आहेत. सध्या ब्रॉयलर पोल्ट्री व्यावसायिकांना (broiler poultry professionals) शंभर रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. प्रति पक्षी उत्पादकता खर्चच ११० रुपये असल्याने दहा रुपयांचे नुकसान त्यांना सोसावे लागत असल्याची माहिती आहे.

गावरानचे दर कायम
बॉयलर चिकनचे दर वाढत असताना दुसरीकडे गावरान चिकन (Gavaran Chicken) (जिवंत कोंबडा) ५५० ते ६०० रुपये किलो दराने विक्री होत आहे आहे. हैदराबादी कोंबडीचे दर ३६० ते ३८० रुपये किलो आहे.

कोंबडीच्या खाद्यान्‍यात झालेली भाववाढ आणि इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ठोक बाजारात चिकनचे भाव वाढल्याने दर वाढ करावी लागली अजून भाव वाढण्याची शक्यता आहे.

- हरीश पराते, धोटे चिकन सेंटर

पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना १०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नाही. किरकोळ विक्रेत्यांना मात्र २३० ते २४० रुपये किलो असा दर मिळत आहे. शासनाने पशुखाद्यात झालेली दरवाढ लक्षात घेता अनुदानावर त्याचा पुरवठा करावा.

- शुभम महल्ले, पोल्ट्री व्यावसायिक, शिवपूर, अकोला

मागणी वाढल्याने किरकोळ आणि घाऊक दरही वधारले होते. त्यामुळे अनुदानावर पशुखाद्य पुरवठ्याचा शासनाचा कोणताही विचार नाही.

सुनील केदार,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com