Cactus Fodder : जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून काटेविरहित निवडुंगाचा वापर?

बऱ्याचदा जनावरांना फक्त वाळलेला चारा दिला जातो. अशा परिस्थितीत हिरवा चारा देण्यासाठी काटे विरहित निवडुंगाची लागवड हा चांगला पर्याय पुढे येत आहे.
Cactus Fodder
Cactus Fodder Agrowon

पशुपालकांना विशेषतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याच्या टंचाईचा (Green Fodder Defict) सामना करावा लागतो.

हवामान बदल, दुष्काळी परिस्थिती, नापीक जमीन यामुळे शेतकरी जनावरांना पुरेसा हिरवा चारा देऊ शकत नाहीत. बऱ्याचदा जनावरांना फक्त वाळलेला चारा दिला जातो.

अशा परिस्थितीत हिरवा चारा देण्यासाठी काटे विरहित निवडुंगाची लागवड हा चांगला पर्याय पुढे येत आहे.

उरळी कांचन, पुणे येथील बाएफ संस्थेतील संशोधनातून शास्त्रीयदृष्ट्या शेळी आणि करडांमध्ये अशा प्रकारच्या काटेविरहीत निवडुंगाचा (Thornless Cactus) वापर करण्यात आला आहे.

याशिवाय हिरवा चारा म्हणून काटेविरहित निवडुंग कस उपयुक्त आहे? याविषय़ी अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठान दिलेली माहिती पाहुया. 

Cactus Fodder
जनावरांसाठी चारा म्हणून विविध वनस्पतींचा वापर

निवडुंग, नागफणी किंवा कॅक्टस हे प्रामुख्याने एक काटेरी झाड म्हणून ओळखल जात.निवडुंगाचा वापर शोभेची वनस्पती म्हणून केला जातो.

या निवडुंगाचे विविध प्रकार आहेत. विविध प्रकाराचे आकार असलेल्या निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांशी प्रजातीमध्ये काटे आणि जाड साल असते.

मात्र काही निवडूंगाना काटे नसतात त्यांना काटे विरहित निवडुंग असे म्हणतात. निवडुंगाच्या जातीमध्ये त्रिधारी, चौधरी आणि फड्या निवडुंग असे प्रकार आहेत.

फड्या निवडूंग त्याच्या सपाट खोल नागाच्या फणीच्या आकाराची पाने आणि फळासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला नागफणी सुद्धा म्हणतात.

निवडुंगाच्या पानाच्या दोन्ही बाजूस कोंब येतात. त्यापासून एकावर एक नवीन पानं येतात. अशी रचना या वनस्पतीमध्ये दिसून येते. 

Cactus Fodder
Fodder Deficit : देशात निर्माण झालीय चारा टंचाई

निवडुंगाच्या पानांमध्ये ८० ते ८५ टक्के पाणी असते. या वनस्पतीला जगण्यासाठी अत्यंत कमी पाणी लागत. म्हणून निवडूंग अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, दुष्काळी भागात अति उष्णता किंवा थंडी अशा परिस्थितीमध्ये तग भरून राहते.

त्यामुळे निवडुंगाची लागवड कमी पर्जन्यमान आणि मुरमाड, नापीक, पडीक जमिनीत सुद्धा करता येते. अत्यंत कमी देखभाल खर्च लागतो.

निवडुंगाच्या पानांमध्ये ७ ते ११ टक्के शुष्क पदार्थ, ५ ते ९ टक्के प्रथिने, ११ ते २० टक्के तंतुमय पदार्थ, १२ ते २५ टक्के खनिजे, २ ते ३ टक्के स्निग्धांश व जीवनसत्वे असतात. 

निवडुंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम इत्यादी खनिजे असतात.

तंतुमय पदार्थांच प्रमाण कमी असत. तर कर्बोदकांच प्रमाण ६० ते ७० टक्के असतं. त्यामुळे पानांची पचनियता अधिक असते.

कित्येक पशुपालकांना निवडूंगा बद्दल माहिती असते तरीही काट्यामुळे चारा पीक म्हणून निवडुंगाचा विचार केला जात नाही.

मात्र आता काटेविरहित प्रजातीमुळे निवडुंगाचा वापर चारा म्हणून करण शक्य झाल आहे. या काटेविरहित निवडुंगाचा वापर विशेषत: उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा म्हणून करता येतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com